Home भद्रावती खळबळजनक :- चंद्रपूर शहरात कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने एका महिलेचा अम्बुलँस...

खळबळजनक :- चंद्रपूर शहरात कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने एका महिलेचा अम्बुलँस मधेच मृतू.

 

भद्रावती येथील जैन मंदिर मधील कोविड सेंटर मधे उपचार घेत होती महिला. लोकप्रतिनिधी आहेत तरी कूठे?

कोरोना ब्रेकिंग :-

कोरोना रुग्णांचे वाढत असलेले आकडे व त्या तुलनेत अपुरे असलेले बेड व व्हेंटिलेटर्स यामुळे कोरोना रुग्णांचा वेळेवर उपचार होतं नसल्याने अनेकांचा दुर्दवी मृतू होत असल्याची उदाहरणे दिसत आहे, अशातच दोन दिवसांपूर्वी भद्रावती येथील जैन मंदिर कोविड सेंटर मधील एका ६० वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आल्याने ती उपचार घेत होती. पण तिची अचानक तब्बेत बिघडली असता त्या महिलेला चंद्रपूर मधे हलविण्याचे तेथील डॉक्टरने लिहून दिले, डॉक्टर च्या या सांगण्यावरून त्या महिलेला चंद्रपूर मेडिकल कॉलेज म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील सर्वच रुग्णालयात नेण्यात आले, पण कुठेही बेड मिळाला नाही आणि शेवटी सर्व रुग्णालये फिरल्यानंतर त्या महिलेने अम्बुलँस मधेच जीव सोडला.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही केवळ एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडत आहे. रुग्णांना आक्शीजन बेड मिळत नसल्याने त्यांचा जीव जातं आहे पण जिथे लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांनी या गंभीर बाबी कडे गांभीर्याने बघायला हवे तिथे फक्त पेपरबाजी करून प्रशासनाला ते सल्ले देत आहे आणि सरकारकडे विविध मागण्या संदर्भातील बातम्या पेपर मधे झळकावून आम्ही जनतेच्या मदतीला कसे धावून जातो याचे चित्र रंगवत आहे. खरं तर लोकप्रतिनिधी हा जनतेच्या मताने निवडून येतो पण जेंव्हा जनतेला मदत करायची असते तेव्हां हे लोकप्रतिनिधी नेमक्या कुठल्या गुहेत असतात हेच कळत नाही. ज्या अवैध मार्गाने आणि भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये हे लोकप्रतिनिधी कमावतात तिथे जनतेला आरोग्य सुविधा करण्यासाठी हे मागे का? हा गंभीर प्रश्न असून आता तरी जनतेने आपला लोकप्रतिनिधी हा जनसेवक असलेला निवडावा जेणेकरून आपल्या स्वार्थापेक्षा जनतेचे हित तो जोपासेल. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here