Home भद्रावती स्तुत्य कार्य :- कोविड सेंटरसाठी सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी आपले...

स्तुत्य कार्य :- कोविड सेंटरसाठी सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी आपले मंगल कार्यालय केले प्रशासनाच्या सुपूर्द.

 

प्रशासनातर्फे लवकरच साकारणार 200 पेक्षा जास्त बेडचे कोविड सेंटर.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाढत असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व दररोज वाढत असलेला मृतांचा आकडा यामुळे जिल्ह्यातील सरकारी व खाजगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. अशातच कालच भद्रावती तालुक्यातील कुसणा या गावातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिला रुग्णांला भद्रावती येथील जैन मंदिर कोविड सेंटर मधून चंद्रपूर ला हलवले असता बेड मिळाले नसल्याने त्या महिला रुग्णाचा अम्बुलंस मधेच मृतू झाला होता. ही बाब अतिशय गांभीर्याने घेत सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी आपले शिंदे मंगल कार्यालय हे कोविड सेंटर करिता मोफत देण्याचा निर्णय करून आज भद्रावती तहसीलदार शिरोळे, भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगल कार्यालय प्रशासनाच्या सुपूर्द केले आहे.

रवींद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्या तुलनेत बेड ची कमतरता लक्षात घेता जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून आपण डॉक्टर सह आरोग्य व्यवस्था दिल्यास मी 700 ते 1000 कोविड रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास तयार असल्याची माहीती दिली होती. दरम्यान शिंदे परिवाराने आता स्वतःचे मंगल कार्यालय व भोजनची व्यवस्था यासह सैनिटायझर मशीन सुद्धा कोविड रुग्णांसाठी देण्याचे जाहीर केल्याने उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिरोळे व स्थानिक सरकारी रूग्णालयाचे डॉक्टर यांनी हे शिंदे मंगल कार्यालय स्वतच्या स्वाधीन करून घेतले असल्याने आता भद्रावती शहरात शिंदे मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभे राहणार आहे.

या शिंदे मंगल कार्यालयात जवळपास चारशे ते पाचशे बेड चे कोविड सेंटर उभे राहू शकते सोबतच डॉ विवेक शिंदे व वैभव शिंदे यांच्या खाजगी रुग्णालयाला कोविड हॉस्पिटलची मान्यता मिळाली असल्याने शिंदे परिवाराकडून आरोग्य सेवा सुद्धा पुरवली जावू शकते त्यामुळे भद्रावती शहरात आता कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारण्यासाठी पाहणी करिता आलेल्या शिष्टमंडळामधे तहसीलदार शिरोळे नगराध्यक्ष अनिल धानोरकर.नगरसेवक सुधीर सातपुते. डॉ. विवेक शिंदे, वैभव शिंदे रवींद्र शिंदे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here