आपल्या देशात आपण पुन्हा पुन्हा लॉक डाऊन का करतोय?
कोरोना वार्ता :-
एकीकडे कोरोना बाधितांची संख्या जगात झपाट्याने वाढत असून देशातील शाळा महाविदयाल व प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात येत आहे तर दुसरीकडे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या लसीकरणानंतर तेथील कोव्हिड-१९ बाधितांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना विषाणू संबंधीच्या बऱ्याच निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे अनिवार्य असण्याचा नियम इस्राईल शासनाने मागे घेतला आहे. सोबतच, देशातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा कालपासून सुरु झाल्या आहेत. दरम्यान, कार्यालयीन ठिकाणी व मोठ्या समारंभांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे.
कोरोना विषाणू विरोधात जगभरात लसीकरण सुरु झाले, तेव्हा इस्राईलमध्ये अतिशय वेगाने लसीकरण पार पाडण्यात आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ९३ लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ८०% लोकांना कोरोनाची लस (किमान एक मात्रा) देण्यात आली आहे. तसेच, लसीकरणाची व्यापकताही वेगाने वाढवण्यात आली आहे. लसीकरणानंतर कोरोना बाधितांचे रुग्णालयातील प्रमाणही कमी झाले व करोनाबळींची संख्याही कमी झाली. त्यामुळे आता इस्राईलने बहुतांश निर्बंध काढून टाकले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासून तेथील विदेशी पर्यटकांचेही लसीकरण सुरु करण्याची घोषणा इस्राईल शासनाने मागील आठवड्यात केली होती.
इस्राईलच्या कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाचे प्रमुख नॅचमन अश यांनी रविवारी इस्रायली पब्लिक रेडिओला सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची अनिवार्यता काढून टाकण्याचा व शाळा परत सुरु करण्याचा हा निर्णय संभाव्य धोक्यांचे आकलन करून घेण्यात आला आहे. इस्राईलच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून देशात एकूण ८ लाख ३६ हजार कोरोना प्रकरणांची नोंद झाली व जवळपास ६,३३१ लोकांचा जीव गेला आहे. देशातील ९३ लाख लोकांपैकी जवळपास ५३% लोकंना फिझर/ बायोनटेकच्या दोन मात्रा (डोस) देण्यात आल्या आहेत. इस्रायलमध्ये १६ वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्यात येत आहे. त्याशिवाय १६ वर्षाखालील अल्पवयीनांना लस देण्यासाठीची चाचपणी सुरू आहे.
इस्रायल देशाने कोरोना संक्रमणा वर मात करून जगापुढे आदर्श निर्माण केला पण भारतात लस निर्माण होतं असतांना त्या लस आपण विदेशात एक्सपोर्ट केल्या आणि देशातील जनतेला लसीचा तुटवडा निर्माण केला त्यामुळे देशभक्ती कशी असावी व देशातील सरकार कसे दक्ष असावे याचा आदर्श इस्रायल देशाने जगाला दाखवून दिला त्यामुळेच आज त्या देशात शाळा सुरू झाल्या आहे तर भारतात सुरू झालेल्या शाळा बंद करण्यात आल्या आहे.