Home भद्रावती आनंदाची बातमी :- शेवटी शिंदे मंगल कार्यालयात प्रशासनाकडून कोविड सेंटर सुरू.

आनंदाची बातमी :- शेवटी शिंदे मंगल कार्यालयात प्रशासनाकडून कोविड सेंटर सुरू.

 

जर प्रशासनाने परवानगी दिली तर कोरोना रुग्णांसाठी शिंदे परिवाराकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणार.

कोरोना वार्ता :-

आपल्या अवतीभवती अनेक कोट्याधीश व लखपती आपण बघत असतो पण आपल्या उत्पनातून काही पैसे समाजकार्यात लावणारे आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे लाखांत कदाचित एखादा व्यक्ती निघतो पण हा एखादा व्यक्ती जर आपल्या निस्वार्थ भावनेचा परिचय देत जर शेकडो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करीत असेल तर तो देवदूतापेक्षा कमी नसतो, अगदी अशाच देवदूत रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या मदतीला धावून आलाय आणि स्वतःचे मंगल कार्यालय, आपल्या डॉ शिंदे बंधूच्या आरोग्य सेवा इतकेच नव्हे तर 10 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन चा आर्डर त्यापैकी 2 मशीन लवकरच उपलब्ध होणार आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना जेवण शिवाय सैनिटायझर मशीन सुद्धा उपलब्ध करून दिल्या.खरं तर रवींद्र शिंदे यांनी  त्या लोकांसमोर आदर्श निर्माण केला ज्यांनी स्वतःहून ह्या सुविधा कोरोना च्या संकट काळात जनतेला उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी जेंव्हा कोरोना रुग्णांची विदारक परिस्थिती बघितली आणि त्यांनी निर्णय केला की कोरोनाच्या या संकट काळात आपण समाजाला काहीतरी दिल पाहिजे आणि त्यांनी लगेच जिल्हाधिकारी यांना आवाहन केले की आपण जिल्हाच्या तालुका स्तरांवर डॉक्टर सह आरोग्य सेवा द्या मी त्या कोरोना रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करतो ज्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी मोठी मदत होईल. आणि लागलीच त्यांनी तसे पत्र जिल्ह्यातील आमदार खासदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देऊन त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली आणि काय आश्चर्य? लागलीच उपविभागीय सुभाष शिंदे यांनी संपर्क साधला आणि भद्रावती तहसीलदार यांना शिंदे मंगल कार्यालय बघून तिथे काय व्यवस्था होते त्याचा आढावा घेण्याचा आदेश केला आणि अगदी दोन दिवसात शिंदे मंगल कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड सेंटर उभे राहिले.

काय म्हणाले डॉ.विवेक शिंदे?

शिंदे मंगल कार्यालयात कोविड सेंटर उघडल्या नंतर डॉ. विवेक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की “परमेश्वराने आम्ह्च्या उमेदीच्या काळात लोकांची सेवा देण्याची संधी दिली असावी,आणि म्हणूनच एवढ्या भयंकर संकटात आम्ही गोरगरिबांना आरोग्य सुविधा, जेवण व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय.”

आता सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना कळवले की आपण तालुका स्तरांवर आरोग्य सेवा द्या शिंदे परिवार त्यांच्यासाठी जेवन राहण्याची सोय तालुकास्तरावर करायला तयार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेश यायचे असून शिंदे परिवाराने ॲाक्सीजन कॅान्सेट्रेटरच्या दहा मशीनचा ॲाडॅर दिला पण आता फक्त दोन मशीन मिळणार असुन त्याही ३० तारखेला मशीन शॅारटेज असल्यामुळे मिळत आहे. शिंदे परिवाराने प्रशासनाला संपूर्ण इमारत मोफत दिली असून त्यामधे किती बेड लावयाचे व कशा प्रकारचे नियोजन करायचे हे प्रशासनावर अवलबुन आहे पण शिंदे परिवारा कडुन जे मागणी नुसार शक्य होईल व बाजारपेठेत उपलब्ध आहे ते पुरविण्याचे काम केल्या जाईल अशी शाश्वती प्रशासनाला त्यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

शिंदे परिवाराच्या या धाडसी निर्णयाने भद्रावती तालुक्यातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होतं आहे, युवा शिवसेनेचे शिष्टमंडळ यांनी रवींद्र शिंदे यांची या संदर्भात भेट घेतली व कोविड सेंटर करिता आम्ही सेवा देण्यास तयार आहो असा मनोदय व्यक्त केला त्यावर रवींद्र शिंदे यांनी ही बाब तहसीलदार यांच्या अखत्यारीत असल्याने त्यांना भेटा असे सांगितले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षल शिंदे, नगरसेवक प्रफुल्ल सरवान, शैलेश पारेकर, कल्याण मंडल, सचिन गावंडे, अंकित चूनारकर, अतुल सारवण इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here