Home विदर्भ धक्कादायक :- रुग्णालयातून पलायन केलेल्या कोरोनाबाधिताची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक :- रुग्णालयातून पलायन केलेल्या कोरोनाबाधिताची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर शोधून काढला मृतदेह.

कोरोना वार्ता :-

कोरोना महामारीत पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णालयात दमछाक होतं असून पूर्णपणे आरोग्य सुविधा मिळत नसल्याने व बाहेरून औषध आणण्याचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने सरकारी रुग्णालयातील रुग्ण सुद्धा आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचा धक्कादायक प्रकार आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात घडला असून एका कोरोनाबाधित रुग्णाने पलायन करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

रुग्णांने केलेले पलायन हे आरोग्य कर्मचारी यांच्या नौकरीवर गदा आणणारे असल्याने त्या कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला व शेवटी त्या रुग्णाचा मृतदेह शहरालगतच्या विहिरीतून शोधून काढला. मग क्रेनच्या साहाय्याने तब्बल २० तासांनंतर त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेला हा रुग्ण रविवारी रात्री रुग्णालयातून पसार झाला. पहाटेपर्यंत परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पोलिसांनी शोध घेतला असता शहरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील शेतात पाहणी करताना त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. काल सोमवारी २० तासांनंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसले तरी कोरोनाची भीती आणिआर्थिक चणचण हेच खरे कारण असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here