Home विदर्भ आरोग्य वार्ता :- कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा...

आरोग्य वार्ता :- कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या.

मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची मागणी. हा दर्जा मिळाल्यास हजारो रुग्णांना उच्च दर्जाची सेवा मिळणार.

हिंगणघाट प्रतिनिधी प्रमोद जुमडे :-

कोरोना बाधितांची वाढती संख्या त्यातच मोठी बाजारपेठ म्हणून दररोज हजारो लोकांचे हिंगणघाट शहरात आगमन यामुळे वाढलेल्या रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपजिल्हा रुग्णालयामार्फत पुरविण्यात उपजिल्हा रूग्णालयाला कठीण जातं असल्याने या रुग्णालयाला जिल्हा रूग्णालयाचा दर्जा जर दिला तर बेडची उपलब्धता वाढेल,तज्ञ डॉक्टर ची संख्या वाढेल,औषधाच्या साठा जास्त प्रमाणात मिळेल, उपचारासाठी लागणारे साधने वाढतील मनुष्यबळ वाढेल त्यामुळे रूग्णाची हेळसांड हाेणार नाही व इथेच उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळाल्याने उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे त्वरित उपजिल्हा रूग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर करा अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांनी मुख्यमंत्री यासह आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या म्हणण्यानुसार हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा कारण उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट येथे कोरोनाबाधीत रूग्णसंख्या वाढत आहे इथे जर जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला तर यात बेडची क्षमता वाढवून 150 किंवा 200 च्या वर बेड वाढले व नियमानुसार बिल्डिंग,अतिरिक्त एम.डी. ,एम. एस तज्ञ डॉक्टर,सर्जन,आय. सी. यु. वॉर्ड,अनुभवी स्टाफ,उपचाराचे आधुनिक उपकरणे,साधन साम्रगी,मनुष्यबळ आदी बाबी वाढतील कारण सध्या इथे योग्य उपचाराअभावी रुग्णांना वर्धा ,नागपूर येथे उपचारासाठी रेफर केले जाते. रुग्णाची परिस्थिती बघून वर्धा, नागपूर ला रेफर करणे गरजेचे असते कारण उपचाराकरता इथे तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नाही, स्त्री रोग तज्ञ , हृदयरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, त्यांच्या उपस्थितीत जो इलाज होतो तो हिंगणघाट ला होत नसल्याने रुग्णांना दुसरीकडे हलविल्या जाते. हिंगणघाट शहर जिल्हातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले व गजबजलेले शहर असून चारही बाजूंनी ग्रामीण भागातून तसेच दुरदुरून लोक मोठ्या संख्येने चांगले रस्ते व इतर दळनवळनाची सोय उपलब्ध असल्याने उपचार करण्यासाठी हिंगणघाट ला येत असतात.

हिंगणघाट ची कृषि उत्पन बाजार समिती विदर्भातील एक नंबर ची बाजारपेठ असल्याने दररोज हजाराच्या संख्येने शेतकरी येत असतात त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील संसाधन,मनुष्यबळ व उपचारासंबधी साधनसामुग्री अपुरे पडत आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे 100 बेड असून कोरोना बाधितांच्या उपचारार्थ ४५ बेड ची व्यवस्था करण्यात आली असून ज्या कोरोना बाधितांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे व त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. या सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच कोरोना बाधितांना आवश्यक त्या सेवा घेता येत नाही नसल्यामुळे पेशंटला वर्धा, नागपूर येथील सरकारी व खाजगी दवाखान्यात हलविण्यात येत आहे तेथेही बेड उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना बाधितांना उपचारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय इथे दोन अर्बन प्राथमिक केंद्र सुद्धा आहे एक टाका ग्राउंड व एक शुक्रवार बाजार भरतो तिथे पण दोन्ही ठिकाणी डॉक्टर नाही व एकाच डॉक्टर कडे चार्ज आहे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सुविधा असूनही अनेकांना जीवघेण्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेउपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरीत देण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार श्री. रामदासजी तडस व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here