महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. मनपा प्रशासनाचा भ्रष्ट कारभार आला चव्हाट्यावर.
प्रशासनाचा भ्रष्ट कारभार भाग -१
चंद्रपूर शहरातील कबिर नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे महाराष्ट्र शुश्रूषाग्रुह अधिनियम 1949 च्या कायद्याचा भंग करून व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्राचा अनादर करून डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांच्या स्वर्गीय डॉ. संगीता पी. कुमार अँड डॉ. टिपले नर्सिंग होम ला महानगरपालिकेने कबीर नगरच्या रहिवाशांचा आक्षेप असतांना सुद्धा 9 खाटांच्या नर्सिंग होमची बेकायदेशीर मंजुरी दिली ती तत्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले निवेदनातून केला आहे.
चंद्रपूर मुल रोड वर शास्त्रीनगर प्रभागात अरविंद नगर, विवेक नगर व कबिर नगर ही पुर्णपणे लोकवस्ती असून या परिसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. अंदाजे २० वर्षापूर्वी कबिर नगर स्थित सर्व्हे क्रं. १०७/५९/अ मधील प्लॉट क्रं.१३ या भुखंडावर डॉ. संगिता पी. कुमार यांनी इमारत उभी करून कोणतीही परवानगी नसतांना नर्सिंग होम सुरू करण्याचे प्रयत्न इमारत पुर्ण झाल्यावर सुरू करण्यात आले होते, मात्र त्यावेळी कबिर नगर स्थित नागरीकांनी तसेच आसपासचे लोकवस्तीतील नागरीकांनी प्रखर विरोध केल्यामुळे डॉ. संगिता पी कुमार याचे बेकायदेशीर नर्सिंग होम सुरू झाले नव्हते. दुर्देवाने अंदाजे 3-4 वर्षापुर्वी डॉ. संगिता पी कुमार यांचा मृत्यु झाला आहे. परंतु दि.12/04/2021 रोजी काही कामगार प्लॉट क्रं.13 वरील इमारतीची साफसफाई करण्याकरीता आले असता, त्याचेकडून वार्डातील नागरिकांना माहीत झाले की, लवकरच सर्व्हे क्र. 107/59/अ मधील प्लॉट क्र.13 या भुखडावर बांधलेल्या इमारतीमध्ये डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांचे नर्सिंग होम सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याचं दरम्यान त्या ठिकाणी दवाखान्याकरीता आवश्यक असलेले बेड व इतर सामान इत्यादी सुध्दा आणण्यात आले. कबीर नगर स्थीत नागरीकांना शंका आहे की, कोरोना कालावधीत उद्भवलेल्या परिस्थीतीत, दवाखाने कमी पडत आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेत या ठिकाणी दवाखान्याकरीता आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता इमारतीमध्ये नसतानाही व बांधलेली इमारत ही नर्सिंग होम करीता मंजुर झालेली इमारत नसतांना परिस्थीतीचा गैरफायदा घेत, या ठिकाणी डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांनी
नर्सिंग होम सुरू करण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे कबीर नगर येथील रहिवाशांनी याच 12 एप्रिलला आंदोलन सुरू केले होते व पत्रकार परिषद घेतली होती. त्याच दिवशी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन या इमारतीला नर्सिंग होम ची परवानगी देऊ नये अशी मागणी रहिवाशांनी केली असता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपा आयुक्त यांना ही बाब तपासून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले पण महानगरपालिकेत हा अर्ज 13 एप्रिललाच पोहचला असतांना पालकमंत्री यांच्या आदेशाला न जुमानता व डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांनी दिनांक 15 एप्रिलला मनपा आयुक्तांकडे परवानगी मागितली व आयुक्तांनी दिनांक 16 एप्रिललाच या नर्सिंग होम ला परवानगी दिली आहे. जी बेकायदेशीर आहे.