महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.
प्रशासनाचा भ्रष्ट कारभार भाग -१
चंद्रपूर शहरातील कबिर नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे महाराष्ट्र शुश्रूषाग्रुह अधिनियम 1949 च्या कायद्याचा भंग करून व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्राचा अनादर करून डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांच्या स्वर्गीय डॉ. संगीता पी. कुमार अँड डॉ. टिपले नर्सिंग होम ला महानगरपालिकेने कबीर नगरच्या रहिवाशांचा आक्षेप असतांना सुद्धा 9 खाटांच्या नर्सिंग होमची बेकायदेशीर मंजुरी दिली ती तत्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले निवेदनातून केला आहे.
चंद्रपूर मुल रोड वर शास्त्रीनगर प्रभागात अरविंद नगर, विवेक नगर व कबिर नगर ही पुर्णपणे लोकवस्ती असून या परिसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. अंदाजे २० वर्षापूर्वी कबिर नगर स्थित सर्व्हे क्रं. १०७/५९/अ मधील प्लॉट क्रं.१३ या भुखंडावर डॉ. संगिता पी. कुमार यांनी इमारत उभी करून कोणतीही परवानगी नसतांना नर्सिंग होम सुरू करण्याचे प्रयत्न इमारत पुर्ण झाल्यावर सुरू करण्यात आले होते, मात्र त्यावेळी कबिर नगर स्थित नागरीकांनी तसेच आसपासचे लोकवस्तीतील नागरीकांनी प्रखर विरोध केल्यामुळे डॉ. संगिता पी कुमार याचे बेकायदेशीर नर्सिंग होम सुरू झाले नव्हते. दुर्देवाने अंदाजे 3-4 वर्षापुर्वी डॉ. संगिता पी कुमार यांचा मृत्यु झाला आहे. परंतु दि.12/04/2021 रोजी काही कामगार प्लॉट क्रं.13 वरील इमारतीची साफसफाई करण्याकरीता आले असता, त्याचेकडून वार्डातील नागरिकांना माहीत झाले की, लवकरच सर्व्हे क्र. 107/59/अ मधील प्लॉट क्र.13 या भुखडावर बांधलेल्या इमारतीमध्ये डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांचे नर्सिंग होम सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याचं दरम्यान त्या ठिकाणी दवाखान्याकरीता आवश्यक असलेले बेड व इतर सामान इत्यादी सुध्दा आणण्यात आले. कबीर नगर स्थीत नागरीकांना शंका आहे की, कोरोना कालावधीत उद्भवलेल्या परिस्थीतीत, दवाखाने कमी पडत आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेत या ठिकाणी दवाखान्याकरीता आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता इमारतीमध्ये नसतानाही व बांधलेली इमारत ही नर्सिंग होम करीता मंजुर झालेली इमारत नसतांना परिस्थीतीचा गैरफायदा घेत, या ठिकाणी डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांनी
नर्सिंग होम सुरू करण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे कबीर नगर येथील रहिवाशांनी याच 12 एप्रिलला आंदोलन सुरू केले होते व पत्रकार परिषद घेतली होती. त्याच दिवशी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन या इमारतीला नर्सिंग होम ची परवानगी देऊ नये अशी मागणी रहिवाशांनी केली असता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपा आयुक्त यांना ही बाब तपासून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले पण महानगरपालिकेत हा अर्ज 13 एप्रिललाच पोहचला असतांना पालकमंत्री यांच्या आदेशाला न जुमानता व डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांनी दिनांक 15 एप्रिलला मनपा आयुक्तांकडे परवानगी मागितली व आयुक्तांनी दिनांक 16 एप्रिललाच या नर्सिंग होम ला परवानगी दिली आहे. जी बेकायदेशीर आहे.
कबीर नगर येथे उभी असलेली इमारत ही अतिशय दाट लोकवस्तीत असून इमारतींच्या लगतचा रस्ता सुध्दा नर्सिंग होम करीता आवश्यक असलेल्या रूंदीचा रस्ता नाही. याशिवाय लगतच्या इमारती अतिशय जवळ असून त्यामुळे आगी सारख्या घटना झाल्यास त्या ठिकाणी फायर ब्रिगेड सारखी यंत्रणा पोहचणे शक्य नाही. नुकताच भारतात अश्या अनेक प्रकारच्या घटना घडल्या असून आगिमुळे उपचार घेणारे रूग्ण जळून मृत्यु पावलेल्या आहेत. यामध्ये आठवण ठेवण्यासारख्या, भंडारा जिल्हा रुग्णालय, मुंबई येथील कोविड रूग्णालय, वाडी नागपूर येथील रुग्णालय, या घटना विचार करायला लावणाऱ्या आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने ज्या डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांच्या स्वर्गीय डॉ. संगीता पी. कुमार अँड डॉ. टिपले नर्सिंग होम ला दिनांक 15 मार्च 2021 च्या सुनील खंडेलवाल यांच्या अर्जावरून दिनांक 16 एप्रिल 2021 ला मंजुरी दिली तिथे कोविड रुग्ण सुद्धा येणार आहे आणि कोरोना रुग्णांपासून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे, ती इमारत वाणिज्य वापराकरिता नसून रहिवाशांना राहण्यासाठी आहे. शिवाय या इमारतीची सुरुवातीला महाराष्ट्र शुश्रूषाग्रूह अधिनियम 1949 अंतर्गत मंजुरी नाही. हा परिसर रहिवाशी यांच्या करिता मंजूर असून इथे जवळपास 4000 दाट लोकवस्ती आहे. या इमारतीचे उत्तरेला 75 वर्षे वय असलेली श्रीमती मदाकिनी धोटेकर यांचे घर असून या दोन इमारतीचे मध्ये कोणताही समास नाही. या इमारतीचे पश्चिमेस 70 वर्षे वय असलेल्या श्रीमती निला चावडा यांचे घर असून या बाजुने सुध्दा इमारत बांधतांना समास सोडलेला नाही. पुर्वेला रस्त्यानंतर जेष्ट नागरीक श्री मेहता व राहुतमारे यांचे घरे असून या घरात राहणारे नागरीक सरासरी 75 वर्ष गाठलेले आहेत. आणि महत्वाची बाब म्हणजे नर्सिंग होम मंजुरी करिता किमान 75 टक्के रहिवाशांचे नाहरकत व मंजुरी असायला हवी ती सुद्धा नाही म्हणजेच सदर इमारत व परिसर रुग्णालय सुरू करण्याचे योग्य नसुन महानगरपालिकेने महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 च्या अटीशर्तीचा स्वतःच भंग करून परवानगी दिली असल्याने यामधे मोठा आर्थिक गैरव्यवहार करून ही मंजुरी नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचे स्पष्ट होते.
एकीकडे अनेक डॉक्टरांनी प्रशस्त ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची परवानगी मागितली ती मनपा आणि जिल्हा प्रशासनाने दिली नाही पण इथे डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल यांच्या नर्सिंग होम ला स्वतः महानगरपालिकेने कायदा वेशीवर टांगून व कबिर नगर, विवेक नगर व अरविंद नगर वासियांचा प्रखर विरोध असतांना जनभावनांचे विरोधात जावून बेकायदेशीर मंजुरी दिली ती त्वरित मागे घेण्यात यावी व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना ची लागण झाल्यास आणि त्यात त्यांचा मृतू झाल्यास ह्या नर्सिंग होम संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक रहिवाशांना घेऊन भ्रष्ट मनपा प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास डॉ. टिपले व सुनील खंडेलवाल व स्वतः महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड. शहर संघटक मनोज तांबेकर महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा शोभा वाघमारे इत्यादीने शासन प्रशासनाला दिला आहे. या आशयाच्या प्रतिलिपी आरोग्य मंत्री, पालकमंत्री विजय वडेट्टीवार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
मनपा चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहे.