Home भद्रावती अभिनव उपक्रम :- डॉ. विवेक शिंदे यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरीच हेल्पलाईन...

अभिनव उपक्रम :- डॉ. विवेक शिंदे यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरीच हेल्पलाईन द्वारे उपचार?

 

सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचे बंधू डॉ. विवेक शिंदे यांच्या हेल्पलाईन उपचार पद्धतीचे सर्वत्र कौतुक.

कोरोना वार्ता :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आणि सिमित डॉक्टर्स यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात जावून उपचार घेणे आता अशक्य झाले आहे, नव्हे आता खाजगी डॉक्टरांना सुद्धा मोठ्या संख्येत वाढलेल्या रुग्णांसाठी उपचार करणे शक्य नाही त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी ज्या पद्धतीने आपले स्वतःचे मंगल कार्यालय प्रशासनाला देऊन तिथे कोविड सेंटर सुरू केले व रुग्णांसाठी जेवणाची व शुद्ध पाण्याची व्यवस्था केली एवढेच नव्हे तर ऑक्शिजन कॉन्सट्रेटर मशीन सोबत सैनिटायझर मशीन ची सुद्धा तिथे व्यवस्था करण्यात ये असल्याने हे सूसज्य असे कोविड सेंटर भद्रावती शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत असताना आता शिंदे परिवाराने यापुढे सुद्धा एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्रात प्रथमच कोरोना पॅाझिटीव्ह रुग्न ज्यांना घरीच विलगिकरणाची नियमाने परवानगी दिली गेली आहे अशा रुग्नाना व ईतर आजार असलेल्या रुग्णांना त्यांच्या रिपोर्ट वरुन हेल्पलाईन व्हाट्सअप क्रमांकावरून रुग्णांच्या रिपोर्ट संदर्भात फॉर्म भरल्यानंतर रुग्णांच्या व्हाट्सअप क्रमांकावर योग्य औषधोपचार व मार्गदर्शन सेवा देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

शिंदे परिवाराचे म्हणणे आहे की ते सामाजिक दायित्व जोपासना करून अभिनव उपक्रम राबवीत आहे, यात कुठेही त्यांच्या कार्याची वाच्यता होण्याची आवश्यकता नाही. वरोरा भद्रावती तालुक्यात ज्या पद्धतीने कोरोना संक्रमण गावागावात पोहचल्याने एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच उपचार व मार्गदर्शन मिळावे म्हणून डॉ. विवेक शिंदे यांनी हेल्पलाईन नंबर 9767744938, 9420139133 वर व्हाट्सअप द्वारे माहीती फॉर्म भरून पाठवावी अधिक माहितीसाठी 878831295 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. जर हे मोबाईल नंबर व्यस्त असेल तर रवींद्र शिंदे यांच्या 9823752077, वर संपर्क करा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं असून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी तालुक्याच्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर्स कडून राबविल्यास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच उपचार व मार्गदर्शन मिळेल पर्यायाने कोरोना संक्रमण होण्याच्या संख्येत मोठी घट होऊन कोरोना चा फैलाव आपण रोखू शकतो असे चित्र दिसत आहे.

Previous articleदखलपात्र :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव राजूरकर धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला.
Next articleहजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या स्वर्गीय डॉ. संगीता पी. कुमार अँड डॉ. टिपले नर्सिंग होमची परवानगी रद्द करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here