Home वरोरा दखलपात्र :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव राजूरकर धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला.

दखलपात्र :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव राजूरकर धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला.

 

ऑक्सिजन घेण्याकरिता नायब तहसीलदार काळे यांच्याकडे सोपवला धनादेश.आणखी मदत करणार.

एक हात मदतीचा :-

वरोरा भद्रावती तालुक्यात कोरोनाचौ मोठी लाट उसळली असून या दोन्ही तालुक्यातील गावच्या गाव कोरोना संक्रमणाने प्रभावित होऊन अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे जीव जातं आहे. एकीकडे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे मात्र प्रशासनाकडे असलेले अपुरे कर्मचारी व मोजक्या निधी आणि समोर आलेलं कोरोनाच भयंकर संकट यामुळे सामाजिक स्तरांवर प्रशासनाला मदतीचा हात मिळणे गरजेचे असतांना कोरोना संकटाच्या निवारणासाठी अनेक हात पुढे येत आहे, असाच एक मदतीचा हात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांनी समोर करून कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होण्यासाठी नायब तहसीलदार काळे यांच्याकडे धनादेश देऊन कोरोना युद्धाच्या लढाईत आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर हे एक यशस्वी ऊद्दोजक असून वरोरा तालुक्यात त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांना ऊद्दोजक बनण्यासाठीचे प्रयत्न चालवले आहे पण कोरोना च्या या संकटात अगोदर यावर मात करणे अत्यावश्यक झाले असल्याने त्यांनी या परिसरातील गोरगरिब कोरोना रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळून त्यांचा जीव वाचवा म्हणून या कार्यात सहभाग नोंदवला आणि कोरोना बाधितांनां आवश्यक ज्या ज्या बाबी व साहित्य लागेल ते त्यांच्या मार्फत ते प्रशासनाला पुरवठा करणार असून प्रशासनाने त्याबाबत त्यांना अवगत करावे अशी त्यांनी विनंती केली आहे. रमेश राजूरकर यांनी दोन्ही तालुक्यातून कोरोना ला हद्दपार करण्यासाठी प्रशासनासोबत जी लढाई सुरू केली आहे.

त्यात त्यांच्यासोबत वरोरा भद्रावती तालुक्यातील ऊद्दोजक, व्यापारी, डॉक्टर्स व संस्थानिक सोबत येणार असल्याने वरोरा भद्रावती तालुक्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांना निश्चितपणे मोठी आरोग्य व्यवस्था मिळणार आहे. रमेश राजूरकर यांच्या या कामाचे सर्वत्र अभिनंदन होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here