शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आरोग्य निदान शिबीरात शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामाण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी व औषध वितरण कार्यक्रम शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी आयोजित केला होता. या शिबिरात शेकडो नागरिकांनी कोरोनासंदर्भात असलेले नियम पाळत या शिबिराचा लाभ घेतला असुन आरोग्य तपासणी केली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत उपलब्ध असलेल्या औषधांचा लाभ घेतला.
हे आरोग्य शिबीर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुढच्या रविवार ला देखील आयोजित करण्यात येणार आहे. सदर आरोग्य शिबीर राहुल भाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले असुन शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रलय मशाखेत्री,अंशुल राऊत, साहिल येरेवार, सुरज आक्केवार, केतन बोकारे, साहिल येलमुले, वेदांत चाफले, तुषार पतरंगे, वेदांत पडगेलवार, ओम गाडीवान, अमोल भोयर, संकेत बनकर, ओम बनकर यांनी अथक परिश्रम घेतले.