Home भद्रावती क्राईम न्यूज :- भद्रावती पोलीसांनी दारू सह १० लाखांचा मूद्देमाल केला जप्त.

क्राईम न्यूज :- भद्रावती पोलीसांनी दारू सह १० लाखांचा मूद्देमाल केला जप्त.

 

बरांज तांडा येथील तब्बल ४२ लाखांच्या कारवाई नंतर आठवड्यातून ही दुसरी मोठी करवाई.

क्राईम न्यूज नेटवर्क :-

भद्रावती पोलीसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले असून दिनांक २६ ते २८ दरम्यान बरांज तांडा परिसरात विशेष मोहीम राबवून तब्बल ४१,९०,००० रुपयाचा गूळ दारू गूळ सडवा व गूळ दारू काढण्याचे साहित्य असे मिळून मुद्देमाल जप्त केला होता आणि आज दिनांक ०३.०५.२०२१ रोजी एकूण १०,५१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून धमाल उडवून दिली आहे.

भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की एक पांढ-या रंगाची शेवरलेट गाडीमध्ये एक इसम नागपुर येथून भद्रावती मार्गे चंद्रपूर कडे अवैधरित्या दारू वाहतुक करीत आहे, अशा खबरी वरून भद्रावती पोलीसांनी एनटिपीसी जवळ ०६.०० वा नाकाबंदी केली असता नागपूर हायवे रोडने चंद्रपूर च्या दिशेने एक पांढ-या रंगाची शेवरलेट गाड़ी येतांना दिसली. पोलीसांची नाकेबंदी पाहुन कार चालकाने त्याची गाडी दुरवर थांबुन पळुन गेला. त्याचा पोलीसांनी पाठलाग केला असता कार चालक श्रीकांत रमेश समर्थ, वय २४ वर्षे, जात तेली रा. संतोष कैकाडे यांचे घरी, वसंतनगर, जुना बाबुळखेडा, भगवान नगर, नागपुर हा मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन २५ खरडयाचे बॉक्समध्ये प्रत्येकी ९० एम. एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या सिलबंद २५०० निपा कि.अं. २,५०,००० रु, शेवरलेट सेल गाड़ी क MH-31-EQ-0534 कि.अं. ८,००,००० रू व आरोपीचा एक मोबाईल कि.अं. १,००० रू असा एकुण १०,५१,००० रु चा माल जप्त केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार, पोशि केशव चिटगिरे, पोशि निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Previous articleधक्कादायक :- कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त.
Next articleप्रेरणादायी :- सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांची पुन्हा कोविड सेंटर ला मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here