Home वरोरा प्रेरणादायी :- सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांची पुन्हा कोविड सेंटर ला मदत.

प्रेरणादायी :- सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांची पुन्हा कोविड सेंटर ला मदत.

 

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमी असल्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर मशीन दिली भेट.

कोरोना वार्ता :-

जिल्ह्यात कोरोना संक्रमण चंद्रपूर शहरांनंतर वरोरा तालुक्यात वाढत असतांना उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक संस्थाना या संकटाच्या काळात कोविड सेंटर ला मदतीचे आवाहन केले होते त्या आवाहनाला हो देत अनेकांनी भरभरून मदत केली आहे यात सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी ऊद्दोजक म्हणून ख्याती मिळविलेले आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारे रमेश राजूरकर यांनी आपल्या कडून कोरोना काळातील वाढता प्रदुर्भाव असल्यामुळे कोरोना ग्रस्तांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा या करिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्फत भेट देऊन या कार्यात अनेकांना मदतकार्य करण्यास प्रेरणा दिली.

कोरोना चे हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तालुक्यात प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना होत असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याने सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक कार्यकर्ते यांनी कोरोना रुग्णांना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी समोर येणे आवश्यक आहे. वरोरा शहरात गांधी उद्यान योग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात एकत्र येत ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ तयार केली आहे. ही ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ अथक परिश्रम करत रुग्णांपर्यत अत्यल्प दरात ऑक्सिजन सिलेंडर पोहोचत आहे. आता सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर कोरोना रुग्णांच्या सेवेत पुढे आले असल्याने व त्यांच्याकडून कोविड सेंटर ला पुनः वेगवेगळी मदत मिळणार असल्याने वरोरा शहरातील कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळण्याचे संकेत मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here