Home चंद्रपूर खळबळजनक :- क्राईस्ट रुग्णालयातील डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना पोलीसांनी केली अटक.

खळबळजनक :- क्राईस्ट रुग्णालयातील डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना पोलीसांनी केली अटक.

 

डॉ.झाडे व डॉ.गुलवाडे यांच्या कोविड सेंटरवर सुद्धा कारवाई होण्याचे संकेत?

क्राईम न्यूज :-

कोरोनाच्या काळात काही डॉक्टर्स लोकांना संधी असून त्यांनी या संधीचा फायदा घेत पैसे कमाविण्याच्या नादात आपल्या सेवेचे बाजारीकरण चालवले आहे. यात चंद्रपूर शहरात रेमडीसीविर इंजेक्शनच्या तुटवडा दाखवून स्वतः डॉक्टर्स या इंजेक्शन चा काळाबाजार जिल्ह्यात करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना रेमडेसिविर इंजेक्शन च्या काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन च्या क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता. पोलीसांनी या काळाबाजाराप्रकरणी अधिक तपास चालवला आहे.

आता या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजाराचे हे खळबळजनक चित्र सामाजिक मन हेलावून सोडणारे आहे कारण एकीकडे रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही म्हणून काही रुग्णांचा मृत्यु होत असतांना दुसरीकडे त्या रुग्णांसाठी येणारे इंजेक्शन हे बाहेर चढ्या भावाने विकून एक प्रकारे हे डॉक्टर्स व नर्सेस रुग्णांची खून करताहेत. शहरातील क्राइस्ट हॉस्पिटल वितरित होणारे इंजेक्शन इथली टोळी चढ्या किंमतीत बाहेर विकत असल्याचा खुलासा झाला असल्याने आता या टोळीने किती इंजेक्शन अशारीतीने बाहेर विकले, याची सत्यता पोलिस चौकशीत कळणार आहे, पण केवळ क्राइस्ट हॉस्पिटलच नव्हे तर इतर हॉस्पिटल मधे सुद्धा तीच परिस्थिती आहे.

चंद्रपूर शहरातील डॉक्टर्स हे मृतकांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे प्रकार समोर आले असून अवाजवी बिल प्रकरणात श्वेता हॉस्पिटलची कोविड सेंटरची मान्यता मनपाने रद्द केली तर डॉ गुलवाडे व डॉ झाडे यांच्या कोविड सेंटर मधे सुद्धा मोठ्या प्रमाणात अवाजवी बिल आकारून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याची चर्चा असून ते हॉस्पिटल सुद्धा प्रशासनाच्या रडारवर आहे. एकीकडे कोरोनामुळे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असतांना संधीचा फायदा घेत डक्टरां कडून सेवेच्या नावावर जर आर्थिक लूट चालत असेल तर अशा डक्टरांवर कारवाई तर झालीच पाहिजे पण त्यांच्याकडून आर्थिक दंड सुद्धा वसूल केला गेला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here