Home महाराष्ट्र खळबळजनक :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू ?

खळबळजनक :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू ?

 

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

न्यूज नेटवर्क :-

दिल्लीतील तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचं निधन झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पण छोटा राजन जिवंत असल्याची माहिती AIIMS ने दिली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम छोटा राजनने सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here