Home भद्रावती दखलपात्र :- मृत शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावली सीडीसीसी बैंक.

दखलपात्र :- मृत शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावली सीडीसीसी बैंक.

 

शेतकरी कल्याण निधीतून चंदनखेडा सिडीडीसी बँकद्वारा मृत शेतकऱ्यांचे वारसांना आर्थिक मदत.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शेतकरी निधीची मदत आष्टा येथील जीवंत विद्युत तारेला स्पर्श लागून मृत झालेल्या शेतकऱ्याचे विधवा पत्नीस बँकेचे चंदनखेडा शाखेत धनादेश देऊन मदत करण्यात आली.सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात सीडीसीसी बँक अंतर्गत शेतकरी कल्याण निधी योजना शेतकऱ्यांचे हितासाठी राबविण्यात येते, या योजनेत आकस्मिक घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचे दुःखात सहभाग म्हणून दहा हजाराचा रोख धनादेश देऊन मदतीचा वाटा बँक उचलत असते.

भद्रवती तालुक्यातील आष्टा येथील 52 वर्षीय पत्तरु दसरु पडवे हा अल्पभूधारक सोसायटी सभासद शेतात काम करताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा दि 13 मार्च ला घटनास्थळी मृत्यू झाला होता, या आकस्मिक संकटाला मदतीचा हात म्हणून सीडीसीसी बँक द्वारा चंदनखेडा शाखेत संचालक रविंद्रजी शिंदे यांचे मार्गदर्शनात शाखा व्यवस्थापक मुन्ना शेख यांचे हस्ते शेतकऱ्यांचे विधवा पत्नी ज्योती पडवे या लाभार्थीस 10 हजार रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला, यावेळेस सोसायटी संचालक बाळासाहेब पडवे ,बँक निरीक्षक पवन ठाकरे, व्यवस्थापक राजु बुरान, सोसायटी व्यवस्थापक अश्विन हुलके,रोखपाल ऐसेकर, गणेश जांभुले आदी गणमान्य उपस्थित होते,

सिडीसीसी बँक ही शेतकऱ्यांचे हितासाठी व मदतीस नेहमीच अग्रस्थानी राहली आहे, वन्यप्राण्यांमूळे ,वीज पडून,पुंजने जळणे या सारख्या आकस्मिक घटना घडल्यास बँक शेतकऱ्यांचे सोबतीला सदैव तत्पर आहे’
रवींद्र शिंदे संचालक-

Previous articleलक्षवेधक :- तर हजारो वृद्ध नागरिकांचे प्राण वाचले असते – मुंबई हायकोर्ट.
Next articleब्रेकिंग न्यूज :- भर दिवसा वरोरा येथील गांधी चौकात सूकराम या युवकाचा खून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here