Home Breaking News दखल:- शिंदे परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर...

दखल:- शिंदे परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी श्री मंगल कार्यालय कोविड सेंटरला दिली भेट.

 

जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वात मोठे कोविड सेंटर उभारणाऱ्या भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल.

ता.प्र भद्रावती :-

आज चंद्रपूर जिल्ह्यात कोविड रुग्णांना अत्यावश्यक सुविधा देणारे कोविड सेंटर हे भद्रावती येथील शिंदे परिवाराने तयार करून प्रशासनाला विनामूल्य दिले व सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांच्या देखरेखीखाली इथे सर्व सुविधा मिळत आहे. कोविड-१९ च्या या आपात्कालीन स्थितीत भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांनी कोविड रुग्णांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत आज (दि.१३ मे) ला स्थानिक श्री मंगल कार्यालय येथील कोविड सेंटर व शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली व कोविड सेंटर तथा हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी डॉ. विवेक शिंदे व रविंद्र शिंदे यांचे सोबत हंसराज अहीर यांनी चर्चा केली. भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार तर्फे ग्रामीण भागातील जनतेकरीता तालुक्यातील ग्रामपंचायतींना मास्क, सॅनिटायजरचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जाणून घेतली.

शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधे निशुल्क ओपीडी, हेल्पलाईन नंबर, श्री मंगल कार्यालयातील चारशे खाटांचे निशुल्क कोविड केअर युनिट, जिल्ह्यातील रुग्णांकरीता बेड, ऑक्सीजन व प्लाज्मा डोनरची व्यवस्था करुन देणे, हे सर्व जाणून या कार्याचे कौतुक अहीर यांनी केले. शिंदे परीवाराचे जिल्ह्यातील हे पहिले निशुल्क कोविड सेंटर असुन भविष्यात या कार्याचा आदर्श समाजापुढे राहील असे अहीर म्हणाले.
यावेळी अहीर यांनी वैद्यकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या परीश्रमाचे कौतूक केले. माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, संजय वासेकर, गोपाल बिंजवे, व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleसीडीसीसी बॅकेचे अध्यक्ष सतोषसिगं रावत यांनी कोरोना बाधितांसाठी केली ऑक्सिजन रुग्णवाहिकेची व्यवस्था
Next articleदखलपात्र :- रवींद्र शिंदे यांनी वरोरा तालुक्यात सुद्धा वाटले आवश्यक आरोग्य साहित्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here