Home वरोरा दखलपात्र :- रवींद्र शिंदे यांनी वरोरा तालुक्यात सुद्धा वाटले आवश्यक आरोग्य साहित्य.

दखलपात्र :- रवींद्र शिंदे यांनी वरोरा तालुक्यात सुद्धा वाटले आवश्यक आरोग्य साहित्य.

 

स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार टेमुर्डा येथील विलगिकरण कक्षात कोरोना बाधितांना मिळाले साहित्य.

कोरोना न्यूज :-

इच्छा तिथे मार्ग असे म्हटल्या जाते. अर्थात ज्यांना संकटाच्या काळात लोकांना मदत द्यायची आहे त्यांनी मानत इच्छा बाळगली तर ते कुठेही मदत पोहचू शकतात. खरं तर सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी कोरोना च्या संकटकाळात आपले स्वतःचे मंगल कार्यालय कोविड सेंटर साठी प्रशासनाला देऊन तिथे चारशे बेड चे सुसज्ज कोविड सेंटर उभारले शिवाय मोफत जेवण व आवश्यक ऑक्सिजन कोन्सनट्रेटर सह औषधीचा पुरवठा सुद्धा केला त्यामुळे भद्रावती शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांनाच्या या रुग्णसेवेची दखल चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्राने घेतली पण रवींद्र शिंदे हे इथेच थांबले नाही तर त्यांनी वरोरा तालुक्यात सुद्धा आवश्यक सुविधा पुरविण्यात कार्य सुरू केले आहे.

टेमुर्डा परिसरातील कोरोना बाधितांच्या विलगिकरण कक्षात आवश्यक सुविधा नसल्याने शिवसेनेचे दत्ता बोरीकर यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र तरीही त्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने त्यांनी रविँदे शिंदे यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर लगेच त्यांनी टेमुर्डा येथील प्राथमिक शाळेत असलेल्या विलगिकरण कक्षात पीपीई किट, 2000 मास्क व सैनिटायझर इत्यादी साहित्य भेट म्हणून दिले. याप्रसंगी दत्ता बोरीकर यांच्यासह सूरज निब्रड त्रिशूळ घाटे अतुल गेडाम गजानन गोवरदीपे मंगेश भागडे अमित चिवन्डे संजय गारघाटे सुरेश टेकाम डॉ आशिष देवतळे शुभम निखाडे इत्यादींनी रवींद्र शिंदे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here