Home महाराष्ट्र गौरव :- हिंदकेसरींनी कोरोनाच्या संकटात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल आमदार निलेश लंके ना...

गौरव :- हिंदकेसरींनी कोरोनाच्या संकटात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल आमदार निलेश लंके ना दिला कोरोना केसरी किताब.

 

अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपये धनादेश देऊन केला गौरव 

गौरव वार्ता :-

कोरोना च्या या कठीण काळामध्ये सध्या महाराष्ट्रभर चर्चेमध्ये असलेले आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपये चा धनादेश देऊन गौरविण्यात आले. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये त्यांनी केलेले सेवाकार्य मानवतेच्या दृष्टीने एक अमूल्य उदाहरण आहे.लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक याची योग्य सांगड घालत त्यांनी लोकसेवा सुरू ठेवली आहे.
एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहतोय. स्वतः मैदानांत उतरून आपल्या लोकांसाठी कोरोनाशी दोन हात करत खऱ्या अर्थाने पारनेर चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना बरोबर ची कुस्ती चितपट करण्याचे कार्य केलेले आहे. म्हणून हिंदकेसरी फाउंडेशन सुर्ली,कराड च्या वतीने हिंदकेसरी मा.पै.संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा,एक लाख रुपये चा धनादेश,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व त्यांना कोरोना केसरी हा किताब देण्यात आला.
यावेळी मा.श्री.नवनाथ पाटील (भाऊ),सुर्ली गावचे सरपंच मा.श्री.दत्तात्रय वेताळ,समाजसेवक मा.निसार मुल्ला,मा.पै.सोनू मदने,माजी उपसरपंच मा.श्री.कृष्णत मदने,मा.पै.अमोल लंके,मा.पै.सुरज भुजबळ,मा.पै.भुजबळ सर हे उपस्थित होते.पारनेर(भाळवणी) जिल्हा अहमदनगर येथे हा सर्व कार्यक्रम पार पडला.

Previous articleदखलपात्र :- रवींद्र शिंदे यांनी वरोरा तालुक्यात सुद्धा वाटले आवश्यक आरोग्य साहित्य.
Next articleक्रूरतेतही माणुसकी? खुनी निलेश ने मृतक सुखरामला रुग्णालयात केले होते भरती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here