Home वरोरा क्रूरतेतही माणुसकी? खुनी निलेश ने मृतक सुखरामला रुग्णालयात केले होते भरती?

क्रूरतेतही माणुसकी? खुनी निलेश ने मृतक सुखरामला रुग्णालयात केले होते भरती?

 

दोन्ही मित्रांच्या आपसी पैशांच्या वादातून एकाचा खून झाल्याची चर्चा.

वरोरा प्रतिनिधी :-

एकवेळा शत्रू बरा कारण तो कायम आपल्या डोक्यात असतो त्यामुळे आपण सावध असतो पण मित्र कधी वैरी होईल याची शाश्वती नसते आणि मग आपसी वादाची परिणिती खुनापर्यंत पौहचते आणि मग मित्र मित्राचा खून करतो अगदी अशीच एक घटना गुरुवारच्या दिवशी सायंकाळी 4-30 च्या दरम्यान गांधी चौक वरोरा येथे घडली असून निलेश ढोक या युवकाने पैशांच्या शूल्लक वादातून आपला मित्र सुखराम आलम याचा गळ्यावर चाकूने वार करून खून केला.

सूकराम अलाम या मित्राकडे असलेले उधारीचे पैसै वारंवार तगादा लावूनही न मिळाल्याने व पैशाची मागणी केली असता शिवीगाळ केल्याने संतापलेल्या निलेश ढोक या मित्राने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ठार मारले.मात्र निलेश च्या हातातून आपल्याच मित्राला ठार मारण्याची इच्छा नव्हती पण रागाच्या भरात ही घटना घडली म्हणून तो घटनास्थळावरून पळून न जाता त्याने आपला मित्र सुखराम जिवंत असेल म्हणून स्वतःच त्याला उपजिल्हा रुग्णालयात भरती केले पण दरम्यान सुखरामने जीव सोडला होता.पण मित्राने मित्राचा खून करावा व तो सुद्धा शूल्लक पैशासाठी ही गोष्ट मात्र समाजमनाला वेदना देणारी ठरली आहे.पण क्रूरतेतही माणुसकी दाखवत व घटनास्थळावरून पळून न जाता त्याला रुग्णालयात भरती केल्याने निलेश ने जाणीवपूर्वक खून केला नसावा असे सुद्धा बोलल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here