Home भद्रावती कंत्राटदाराच्या संथगती होणाऱ्या भद्रावती चंदनखेडा रस्ता बांधकामाने घेतला पटवाऱ्याचा बळी.

कंत्राटदाराच्या संथगती होणाऱ्या भद्रावती चंदनखेडा रस्ता बांधकामाने घेतला पटवाऱ्याचा बळी.

 

रात्री रस्त्यावरून जातांना पटवारी जगन जांभूले यांच्या गाडीला अपघात कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार कां?

भद्रावती प्रतिनिधी :-

शासनाच्या दिरंगाई ने म्हणा की कंत्राटदार यांच्या चुकीमुळे म्हणा भद्रावती चंदनखेडा रस्ता बांधकाम कार्य मागील पाच वर्षापासून सुरू आहे पण पूर्ण झाले नाही अशी ओरड या परिसरातील जनता करीत आहे. महत्वाची बाब म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या या कामात मुख्य कंत्राटदार हा नेमका कुठला आहे हेच लोकांना माहीत नाही त्यामुळे शेवटी या कामाबद्दल नेमक विचारायच कुणाला हा प्रश्न प्रत्येकाला पडल्यामुळे आहे त्या स्थितीत काम सुरू आहे. पण अगोदरच अरुंद रस्ते त्यातच जर नवीन रस्ते बांधकाम असेल व त्यात पुलाचे काम सुद्धा जर असेल तर त्या ठिकाणी दर्शनी भागावर बोर्ड लावून येणाऱ्या जाणाऱ्यांना माहीती देणे आवश्यक असतांना तिथे मात्र अशी कुठलीही सुविधा नाही त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्यांना अंधारात कळल नाही तर अपघात निश्चित होईल अशी परिस्थिती आहे.

या रस्त्याने दिनांक 12 मे ला रात्री 8.10 दरम्यान हरणे राईस मिल जवळ भद्रावती ते चंदनखेडा मार्गे पटवारी जगन जांभूले हे बाईकने जात असतांना कट्घरे नसलेल्या बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ त्यांचा बाईकने टक्कर लागून अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. खरं तर पुलाचे बांधकाम सुरू असतांना तिथे जवळ सूचना बोर्ड आवश्यक आहे पण कंत्राटदारानी तो लावला नाही आणि त्या रस्त्याचे बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचे व बोगस असल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे पटवारी जगन जांभूले यांच्या अपघाताला कंत्राटदार जबाबदार पकडून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here