Home वरोरा क्राईम न्यूज :- आबीद शेख हत्त्या प्रकरणी कुख्यात गुंड देवा नौकरकार याला...

क्राईम न्यूज :- आबीद शेख हत्त्या प्रकरणी कुख्यात गुंड देवा नौकरकार याला स्थानिक गुन्हे शाखा टीमने केली अटक

 

मृतक आबीद शेख यांच्या पत्नीने आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टम करणार नसल्याचा दिला होता इशारा.

जाकीर शेख प्रतिनिधी :-

वरोरा शहरात घडलेल्या बहुचर्चित आबीद शेख हत्त्या प्रकरणातील मुख्य आरोपी देवा नौकरकार हा कालपासून फरार होता, पण आज आबीद शेख यांच्या पत्नीने जोपर्यंत मुख्य आरोपींना पकडणार नाही तोपर्यंत माझ्या पतीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीसांची पुरती गोची झाली त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या टीमने सहायक पोलीस निरीक्षक एकरे यांच्या माध्यमातून कुख्यात गुंड व आबीद शेख याचा हत्त्यारा देवा नौकरकार याला अटक करण्यात आली आहे व आता त्याला वरोरा येथे आणण्यात येत आहे.

कुख्यात आरोपी देवा नौकरकार हा आपली गैंग बनवून अवैध दारूचा व्यवसाय सट्टापट्टी व गांजा विक्री या व्यवसायात असायचा याचेवर वरोरा पोलीस स्टेशन मधे व इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. खरं तर याला प्रशासनाने तडीपार करायला हवे होते पण मानसिक संतुलन बिघडल्याचे नाटक करून अनेकदा त्यांनी पोलीस प्रशासनाला चकमा देऊन स्वतःला वाचवले आहे. एकेकाळी मृतक आबीद शेख व देवा नौकरकार यांची दोस्ती होती व दोघेही मिळून अवैध व्यवसाय करायचे पण आता ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या क्रूपेने देवा नौकरकार याचा धंदा वाढला होता व त्याचे पैशांच्या वादावरून आबीद शेख यांच्यासोबत वैर झाले होते एवढेच नव्हे तर देवा हा आबीदला ठार मारण्याच्या धमक्या देत होता व त्याच्या वडिलाला सुद्धा तुझ्या मुलाला मी ठार करतो म्हणून धमकी द्यायचा आणि त्याने अवैध पद्धतीने सहा राऊंड माऊजर विकत घेवून आबीद शेख याला ठार मारण्याचा कट रचत होता आणि काल त्याने अखेर डाव साधला आणि आबीद शेख याचा खून केला.

Previous articleकंत्राटदाराच्या संथगती होणाऱ्या भद्रावती चंदनखेडा रस्ता बांधकामाने घेतला पटवाऱ्याचा बळी.
Next articleधक्कादायक :- पोलिसांना गुंगारा देत राजा ठाकूरची अवैध दारू विक्री सुरूच ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here