भूमिपूत्राची हाकच्या बातमी वरून कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना काय मिळाले?
पोलीस पंचनामा :-
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा पोलीस प्रशासनाने सद्ध्या कुण्या दारू माफियांला हप्ता घेऊन अवैध दारू विक्री किंव्हा वाहतुकीची परवानगी दिली नाही कारण राज्यात वाझे पोलीस प्रकरण आणि त्यामुळे राज्यांच्या ग्रूहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात वाझे प्रकरण होऊ नये म्हणून काही दिवसासाठी पोलीसांनी आपले “सदरक्षनाय खलनिग्रहनाय” हे ब्रीद जोपासले आहे, पण या संधीचा फायदा घेवून बिना परवानगीने अवैध दारू विक्री राजा ठाकूर करीत असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.
या संदर्भात भूमिपूत्राची हाक न्यूज वेब पोर्टल वर महाकाली मंदिर परिसरात लाखों रुपयाची दारू राजा ठाकूर विकतो त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. या बातमीच्या अनुषंगाने काही पोलीसांनी त्या अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या राजा ठाकूर यांच्या घरांवर छापे टाकले पण कुठलाही माल मिळाला नसल्याचे पण त्याच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम पोलिसांना दिली असल्याची बाब स्वतः राजा ठाकूर यांनी आपल्या मित्रांना सांगितली असल्याची चर्चा आहे व त्यामुळे राजा ठाकूर यांचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच आहे. पण तो पोलिसांना गुंगारा देत आहे, त्यामुळे पोलीस नेमके करत काय आहे? हेच कळायला मार्ग नसून पोलीसांनी त्यांच्या घरावर पाळत ठेऊन किंव्हा त्याचे सर्व दारू उतरवीन्याचे अड्डे शोधून काढल्यास त्याला मुद्देमाला सह पकडता येते. पण महाकाली पोलीस चौकी मधील जे जुने पोलीस कर्मचारी आहे त्यांचे राजा ठाकूर सोबत मधुर सबंध आहे त्यामुळे ते यांना लोकेशन देत असतील कां? हा प्रश्न निर्माण झाला आहे.पण पोलीसांनी मानत आणल तर राजा ठाकूर काय चीज आहे? आता खरंच पोलीस राजा ठाकूर याला अटक करतात की पुन्हा तेच ते रडगाणे गातात हे येत्या काही दिवसात कळेलच …