Home वरोरा पेट्रोल ,डिझेल,गॅस तथा रासायनिक खतांच्या किमती कमी करा.राष्ट्रवादीचे प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्री यांना...

पेट्रोल ,डिझेल,गॅस तथा रासायनिक खतांच्या किमती कमी करा.राष्ट्रवादीचे प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्री यांना निवेदन

 

वरोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दरवाढीचा केला तीव्र निषेध.

वरोरा प्रतिनिधी :-

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नागरिक व देशाचा पोशिंदा त्रस्त आहे.कोरोना काळात औषधी ,दवाखान्याचा न परवडणारा खर्च,आणि लाकडाऊन मध्ये सर्व व्यवसाय ठप्प असल्याने मजुरदाराला मजुरी मिळणे दुरापास्त झाले आहे.समाजातील प्रत्येक वर्गाला रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा संकटमयी काळात सरकारनी नागरिकांना मदत करण्यापेक्षा पेट्रोल,डिझेल,गॅस चे दर वाढवून जनतेला महागाई च्या खाईत लोटले आहे. त्याचा बोजा सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसला आहे.पेट्रोल ,डिझेल, गॅस,आणि गगनाला भिडलेल्या खतांच्या किमती कमी करण्याची मागणी घेऊन राष्ट्रवादीचे नेते ऍड.मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या नेतृत्वात नुकतेच वरोरा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देतांना शिष्ठमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष विशाल पारखी,युवक ग्रामीण चे अध्यक्ष दिनेश मोहारे,शहर अध्यक्ष तथा न.प.सदस्य ऍड.प्रदीप बुऱ्हाण,जयंत टेमुर्डे,संजय भोयर,कमलाकर भोंग आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून,उन्हातान्हात शेतीमध्ये राबून काबाडकष्ट करतो.आणि शेतीची मशागत करून जमिनीत बी टाकून एका दाण्यापासून हजार दाण्याची निर्मिती करणाऱ्या निर्माता बळीराज्याला खताचे भाव वाढवून शासनाने महागाईच्या खाईत लोटले आहे.शेतकरी पीक कर्जावर आपली शेती सजवितो परंतु,अजूनपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही.पुरता खचलेला शेतकरी हा महागाईच्या संकटात सापडला आहे.खतांच्या पूर्वीच्या किमतीपेक्षा 40 % भाववाढ करून शासनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे शासनाने वाढलेल्या खतांच्या किंमती कमी करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावाअशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नी केली आहे.
खतांच्या वाढत्या दरासह पेट्रोल,डिझेल,गॅस चे दर सुद्धा गगनाला भिडले आहे. कोरोना महामारीत अगोदरच व्यवसाय ठप्प झाले आहे.नागरिक आर्थिक संकटात सापडले असून,रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असतांना पेट्रोल,डिझेल,गॅस चे दर वाढवून पुन्हा एकदा शासनाने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.महागडे पेट्रोल ,डिझेल गॅस ची महागाई ही सर्वसामान्य नागरिकांच्या माथी पडली आहे.बँकेचे कर्ज काढून वाहने घेतली असून,इंधनाचे महागामुळे ती घरीच ठेवण्याची पाळी जनतेवर आली आहे.
यातच गॅस ची किंमत वाढवून सर्वसामान्य जनतेनी गॅसवर स्वयंपाक करावे की नाही नाही तर जुन्या पद्धतीने चुलीवरच स्वयंपाक करण्याची पाळी तर नाही येणार ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. सरकारने गगनाला भेदलेले वाढते दर मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here