Home वरोरा खंत :- वरोरा नगरपरिषदेच्या स्थापनेला झाले १५४ वर्ष तरीही वरोरावासीय मूलभूत गरजांपासून...

खंत :- वरोरा नगरपरिषदेच्या स्थापनेला झाले १५४ वर्ष तरीही वरोरावासीय मूलभूत गरजांपासून वंचित?

 

शहरातील सर्व जनतेला अजूनही शुद्ध पाणी व इतर सुविधा मिळत नसल्याची ओरड. लोकप्रतिनिधी यांच्या नावाने बोंबा?

प्रतिनिधी जाकीर शेख :-

इंग्रजांच्या काळापासून तर आजपर्यंत वरोरा नगरपरिषदला जवळपास 154 वर्ष झाल्याने नगरपरिषद मधील सत्ताधारी नगरपरिषदेचा स्थापना दिवस साजरा करतीलही पण हा स्थापना दिवस साजरा करतांना नगरपरिषद सत्ताधारी यांनी आजपर्यंत शहरातील जनतेला नेमकी काय सुविधा दिली? याचा लेखाजोखा मांडण्याची खरे तर आवश्यकता आहे, कारण आजही वरोरा शहरवाशीय मूलभूत सुविधा पासून वंचित आहे.आजवर काँग्रेस राष्ट्रवादी सह भाजप ची सत्ता इथे झाली पण शहरातील नागरिकांना जे महत्वाचे आहे, ज्या मूलभूत गरजा हव्या आहे त्या पुरविण्यात सत्ताधारी कमजोर ठरले ही वस्तुस्थिती आहे.

वरोरा शहराला पुरातन इतिहास आहे जसा सर्व शहराला आहे, इथे मध्यभागी ऐतेहसीक तलावाचे सौंदर्यिकरन व खोलीकरन याच्यासाठी दोन कोटी रुपये आले आणि गेले पण केवळ एक दर्शनी गेट शिवाय काहीच झालं नाही. आज शहरातील अनेक वार्डात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही तर जुनी पाईप लाईन तोडून नवीन पाईप लाईन टाकली त्यात सुद्धा पाणी मिळत नाही पर्यायाने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कैँनमधून बाहेरून पाणी आणावे लागत आहे ही खरे तर शोकांतिकाच म्हणावी लागेल. फक्त नगरपरिषद च्या इमारती सभागृह बदलले दोन इमारती नंतर तिसरी इमारतीत नगरपरिषद आली पण वास्तू बदलून चालत नाही तर येथील सत्ताधारी यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी. खरं तर इथे अनेक जाती धर्माचे नगराध्यक्ष झाले सभापती आणि नगरसेवक झाले पण कुणीच शहरातील जिवंत समस्येकडे लक्ष दिलं नाही पर्यायाने 154 वर्षाच्या नगरपरिषदला जर शहरातील जनतेला मूलभूत सुविधा देता येत नसेल तर मग नगराध्यक्ष सभापती व नगरसेवक तिथे नेमके निवडून जाऊन करतात तरी काय? असा प्रश्न पडतो त्यामुळे अशा नगराध्यक्ष सभापती व नगरसेवकांना शहरातील जनतेकडून शुभेच्छा कशा काय मिळेल ?याची कल्पना न केलेलीच बरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here