Home वरोरा कृषि वार्ता :- ग्रामीण भागात जनावरंना तोंडी खुराची लागण, शेकडो जनावरे बाधित.

कृषि वार्ता :- ग्रामीण भागात जनावरंना तोंडी खुराची लागण, शेकडो जनावरे बाधित.

 

पशुवैद्यकीय विभागाचे मात्र याकडे अक्षम दुर्लक्ष. स्थानिक डॉक्टर्स करतात खाजगीत इलाज.

वरोरा तालुका प्रतिनिधी(किशोर डुकरे):-

वरोरा तालुक्यातील आसाळासह इतर ग्रामीण भागात जनावरांवर साथीच्या रोगाने थैमान घातले असून गावातील काही समाज सेवक यांनी संबंधित पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी यांना दूरध्वनीवरून गावामध्ये सुरु असलेल्या रोगाबाबत माहीती देऊन व त्याची तीव्रता सांगून सुद्धा चार दिवस झाले तरी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने जनावरांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चालू हंगामात सर्व शेतकरी आपल्या शेतात नांगरणी व वखरनी करीत आहे मात्र त्यांच्या बैलांना जर हा साथीच्या रोगाने पछाडले असल्याने शेतकऱ्यांची हंगामाची कामे वेळेत पूर्ण होणार नाही त्यामुळे याकडे जिल्हापरिषद प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous articleखंत :- वरोरा नगरपरिषदेच्या स्थापनेला झाले १५४ वर्ष तरीही वरोरावासीय मूलभूत गरजांपासून वंचित?
Next articleपोलीसनामा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची गुन्हेगारांना दहशत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here