Home चंद्रपूर पोलीसनामा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची गुन्हेगारांना दहशत?

पोलीसनामा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची गुन्हेगारांना दहशत?

 

हत्त्या, डैकेती, चोरी व अवैध धंदे यामधे जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तत्काळ अटक करण्यात मिळवले यश.

पोलीसनामा :-

चंद्रपूर जिल्हा हा औधोगीक जिल्हा असून इथे मोठ्या प्रमाणात बाहेरील प्रांतातील लोक कामधंदा करण्यासाठी येतात पण कालांतराने ते इथेच स्थिरावल्या नंतर स्थानिक व्यक्तींच्या मदतीने अवैध धंद्यात येतात आणि गुंडगिरी करून आपली दहशत माजवीतात त्यामुळे जिल्ह्यात अवैध कोळसा, दारू, रेती व गांजा ड्रग्स इत्यादी अवैध धंदे चालतात आणि मग त्या धंद्यातून होणाऱ्या स्पर्धा यामुळे संघटित गुन्हेगारी सुरू होते. सद्ध्या संघटित गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या असून नुकताच वरोरा येथे झालेला आबीद शेख यांची हत्त्या असो, बल्लारपूर येथील सूरज बहुरीयाचा खून असो की राजुरा येथील राजू यादव चा खून असो या सर्व घटना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे धोत्त्यक आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली ही खरी गोष्ट आहे पण त्यावर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असतांना पोलीस प्रशासन जणू अवैध धंदे यांचे पाठीराखे बनले की काय असे वाटायला लागते पण अशाही परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर येथे रुजू झाल्यानंतर दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी चंद्रपूर ला आल्या आल्या त्यांच्या नेत्रूत्वात बल्लारपूर येथील सूरज बहुरीया हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार ला अवघ्या काही दिवसातच पोलीस स्टेशन मधे जमा व्हायला लावले, वरोरा येथील आबीद शेख याची हत्त्या करणारा कुख्यात गुंड देवा नौकरकर याला अवघ्या 24 तासात अहेरीच्या जंगलातून पकडण्यात यश मिळवले. रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत जूनोना चौकातील हत्त्या प्रकरणातील पवन रतन पाटील याला मूल वरून अटक केली. बहुचर्चित मनोज अधिकारी हत्त्याकांड प्रकरणातील फरार आरोपी सीमा घाबर्डे हिला अटक केली.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मधील घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी प्रदीप दिनकर गंगमवार याचा शोध घेऊन अटक केली. सोबतच अनेक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा तपास हा नेहमीच अप्रतिम राहिला आहे.त्यामुळे खाडे यांच्या पोलीस खाक्याची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध धंद्यात मोठी वाढ झाली पण जेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेत बाळासाहेब खाडे रुजू झाले तेव्हपासून जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्याचे यशस्वी कार्य त्यांनी केल्याने अवैध धंदेवाईक यांचे धाबे दणाणले आहे त्यांच्या काळात घरफोडीचे 14 गंभीर गुन्हे उघड करून 12 गुन्हेगारांना अटक केली व त्यांचे कडून 7.28,361/ रू. चा माल हस्तगत करून घरफोडीच्या गुन्हयावर आळा घातला. मोटर सायकल चोरीचे 14 गुन्हे त्यांनी उघड करून 15 चोरटयांना अटक करून चोरीस गेलेल्या एकुण 22 मोटर सायकल किं 9,61,000/- चा माल हस्तगत केला, चोरीचे 5 गुन्हे उघड करून 9 आरोपीना अटक करून चोरीस गेलेला 4,18,799 / रू. चा मुददेमाल त्यांनी हस्तगत केला.

एन डी पी एस अॅक्ट अन्वये 5 गुन्हे नोंद करून गांजा व ब्राउन शुगरच्या 10 तस्करांना अटक करून 4.93.090/-रू. चा गांजा व ब्राउन शुगर जप्त केली असुन त्यात गांजाचे तिन तर ब्राउन शुगर तस्करीचे 2 गुन्हे उघड केले व अमरावती येथील दोन ब्राऊन शुगर तस्कराना ताब्यात घेतले, अवैध दारू वाहतुक व विक्रीचे 44 गुन्हे नोंद करून 76 दारू विकेत्यांना अटक करून त्यांच्याकडून एकुण 236.04,520/-रु.चा मुददेमाल जप्त केला.

जुगार व सटटापटटीचे 5 मोठे गुन्हे नोंद करून 10 आरोपीना अटक करून एकण 1,95.75/ रू. चा मुददेमाल जप्त केला.
सुगंधीत तंबाखु विकीचे 3 मोठे गुन्हे नोंद करून 8 आरोपीना अटक करून एकूण 24.99.000/-रू. या मुददेमाल जप्त केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार राजु उर्फ पागडया जानकीराम शिवतकर रा अष्टमुजा वार्ड चंद्रपुर यास अटक करून त्याचे कडुन दोन तलवार व एक खंजर असे शस्त्र जप्त करून आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला

एकूणच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा रूतबा वाढवला असून गुंतागुंतीच्या गुन्हे प्रकरणात त्यांचा तपास हा वाखाणण्याजोगा आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या तपासात जे पुरावे मिळतात त्या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किंव्हा चौकशी अधिकारी चार्जशीट कशी बनवतात त्यावर आरोपाला सजा होण्याची स्थिती होते त्यामुळे आता वरोरा येथील आबीद शेख हत्त्या प्रकरणात केवळ दोनच आरोपी नसून पुन्हा दुसरे पण आरोपी आहे आणि ते गुन्हेगार मोकळे सुटू नये म्हणून चार्जशीट मधे साक्षदार व पंच हे मजबूत ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे ह्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास बाळासाहेब खाडे यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here