Home चंद्रपूर चंद्रपूर मनसेचा अनोखा उपक्रम, अमित ठाकरे यांच्या वाढदिवशी वाटले आरोग्य साहित्य?

चंद्रपूर मनसेचा अनोखा उपक्रम, अमित ठाकरे यांच्या वाढदिवशी वाटले आरोग्य साहित्य?

 

जिल्हा कारागृहात व जिल्हा सामान्य रुग्णालयात साहित्य वाटप करून साजरा केला वाढदिवस.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार व मनविसे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या नेत्रूत्वात सामाजिक बांधिलकी जोपासून कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात गरजूंना बेडशीट वाटप करण्यात आले तर चंद्रपूर जिल्हा कारागृह येथील कारागृह अधीक्षक आत्राम यांच्या उपस्थितीत कैदी बांधवांना सॅनिटाईझर,मास्क आणि हॅन्ड ग्लोज चे वाटप करण्यात आले.

राजकीय पक्षाच्या नेत्यांचे वाढदिवस जिथे बॅनरबाजी करून हर्ष ऊल्हासात साजरे केले जातात पण मनसेतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अनोखा उपक्रम हातात घेवून कोविड काळात मनसेतर्फे रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर वाटप असो रुग्णांना नेण्यासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था असो की गरीब रूग्णांचे वाढीव बिल माफ करणे असो, असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रमाचे आयोजन मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे ग्रामपंचायत सदस्य मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम मनविसे उपजिल्हाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे शहराध्यक्ष नितीन पेंदाम तालुका सचिव करण नायर शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर रुग्णमित्र कृष्णा गुप्ता चैतन्य सदाफळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here