Home राष्ट्रीय आरोग्य वार्ता :- कोरोना च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका नाही?

आरोग्य वार्ता :- कोरोना च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका नाही?

 

काय म्हणाले एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया?

कोरोना वार्ता :-

कोरोनाची तिसरी लाट ही मुलांवर परिणाम करणारी असेल असे सरकारतर्फे सांगण्यात आले असले तरी त्यामधे कुठलेही तथ्य नाही. आता करोना दुसरी लाट आता हळहळू ओसरत आहे. अशातच आता दिलासा देणारी एक बातमी आली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत नाहीत, असं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असं आधी सांगण्यात येत होतं.

देशातील करोनाच्या स्थितीवर सोमवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली. यात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फार कमी मुलांना संसर्ग झाल्याचं आपल्याला दिसून आलं. यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये सर्वाधिक संसर्ग दिसून येईल, असं वाटत नाही. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असं सांगण्यात येतंय. पण हे तथ्यांवर आधारीत नसल्याचं पेडियाट्रिक्स असोसिएशनचं म्हणणं आहे. संसर्गाचा परिणाम मुलांवर होणार नाही यासाठी नागरिकांनी घाबरू नये, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here