सोन्यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी असल्याचं तज्ञाच मत.
न्यूज नेटवर्क :-
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण सलग तिसऱ्यांदाच आजही सोन्याच्या किंमती (Gold Price) घसरल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याच्या किंमतीत चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरणी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर १० ग्रॅम सोन्याचा वायदा भाव (Gold Price Today) ०.४ टक्क्यांनी खाली घसरून ४८३५८ डॉलरवर पोहोचला आहे.
आज चांदीचा वायदा भाव 0.8 टक्क्यांवरून घसरून ७१७४८ रुपये प्रति किलोवर आला आहे. खरंतर, या आठवड्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) अस्थिरता आल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये घसरण होत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. यासोबतच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळेही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावांमध्ये घसरण होत आहे.
आजा राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ३५० रुपयांनी वाढून ४५,००० रुपयांवर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपयांच्या पातळीवर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम ४६,००० रुपये तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम ४७,००० रुपये आहे.