बल्लारपूर मधील घटना. हत्त्या केल्यानंतर भाचा राजकुमार बहुरीया याने केले पोलिसांकडे समर्पण.
बल्लारपूर क्राईम :-
जिल्ह्यातील वरोऱ्यानंतर बल्लारपूर हत्त्याचे हॉटस्पॉट बनले असून सूरज बहुरीया हत्त्याकांड झाल्यानंतर बल्लारपूरातील ही सर्वात मोठी घटना घडली असून डुक्कर चोरीचा संशय घेऊन भाच्याने आपल्या मामांची धारदार तलवारीने हत्त्या केल्याची सनसनीखेज आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे.
बल्लारपूर येथील आंबेडकर वार्ड मधे मृतक आणि हत्त्या करणारा राजकुमार बहीरीया हे दोघेही राहतात दोघांचे डुक्करं पोसण्याचे धंदे असून शहरातील डुक्करं हे जंगलातील शेतात व इतरत्र पाळले जातात मात्र माझे डुक्करं चोरले असल्याचा संशय भाचा राजकुमार याला आल्याने मागील काही महिन्यांपासून होतं असलेला विवाद हा आणखी भडकला आणि आज सायंकाळच्या जवळपास 6.30 वाजता राकेश दर्शन बहुरीया वय 35 वर्ष याचा धारदार तलवारीने वार करून राजकुमार बहुरीया यांनी हत्त्या केली. दरम्यान हत्त्या करणारा राजकुमार याने बल्लारपूर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असून दुसरा आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.