Home वरोरा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रमामुळे वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांना मदत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रमामुळे वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांना मदत.

 

नैसर्गिक आपत्ती व हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांत ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना व पाळीव जनावरे यांच्या मालकांना बैँकेचा मदतीचा हात, संचालक रवींद्र शिंदे यांचा पुढाकार.

घोडपेठ /नागरी(प्रतिनिधी) :

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आज (दि.२८) ला घोडपेठ परीसरातील घोट निंबाळा येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या पतीला आर्थीक सहकार्य देण्यात आले.

घोट निंबाळा येथील महिला रजनी भालेराव चिकराम या शेतात काम करीत असतांना तीच्यावर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. या घटनेची दखल घेवुन मृत महिलेचा शेतकरी पती भालेराव किसन चिकराम, गणेश भालेराव चिकराम यांना दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश वितरीत करण्यात आला.

नागरी येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेच्या शाखेतर्फे चंद्रशेखर भूजबैले यांच्या बैलावर वाघाने हल्ला केल्याने त्याचा मृत्यु झाला होता त्यांना सुद्धा आर्थिक मदत करण्यात आली, यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे, डॉ.विजय देवतळे दिलीप टिपले प्रकाश बावणे.किशोर भलमे दत्ता बोरीकर चंद्रशेखर भूजबैले सुरेश लोंढे विठ्ठल वरभे शामसुंदर बलखंडे प्रशांत नौकरकरदिलीप महल्ले नरेंद्र ठाकरे गजानन पाटील एम जी गजभूजे एस जे लोखंडे अजय झोटिंग एस आर ईखार देवानंद पिसे इत्यादींची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या सर्वच तालुक्यातील शाखेतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासल्या जात आहे.घोडपेठ येथील शाखेत धनादेश वाटप करताना चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, घोडपेठ ग्रा.प. चे सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.प. सदस्य गटनेते ईश्वर निखाड़े, ज्योती मोरे, लिनाताई बोबडे, रुपाली बावणे, माजी उपसरपंच विनोद घुघुल, सामाजिक कार्यकर्ता सुधाकर मोरे, सचिव पोहरे साहेब, बैंकेचे व्यवस्थापक संजय जेनेकर, निरिक्षक अरुण मांडवकर आदी उपस्थित होते.

यावेळी संपन्न कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवी शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here