Home कोरपणा खळबळजनक :- तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कोळशी घाटावर अवैध उत्खनन सुरू.

खळबळजनक :- तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कोळशी घाटावर अवैध उत्खनन सुरू.

 

घाटधारकांकडून सर्व नियम पायदळी तुडवून विना खनिज परवाना रेतीची परस्पर विक्री.

कोरपना प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून कोळशी घाटावर अवैध उत्खनन व हजारो रेतीचा उपसा केला जात आहे आणि रेतीची साठवणूक करून ती परस्पर विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या व्यक्तीला कोळशी घाट मिळाला त्यांनी घाटावर शासनाच्या नियमानुसार कुठलीही व्यवस्था केली नसून येथील घाटधारक अवैध रेतीचा उपसा करून परस्पर विना खनिज परवाना ती विक्री करीत असल्याची कोरपना परिसरातील चर्चा आहे. यामधे तालुका महसूल प्रशासनाचे अवैध वाळू तस्करांना सहकार्य असल्यानेच अवैध रेती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला जातं असल्याचे बोलल्या जात आहे.

राजस्व प्रशासनाकडून रेती घाट धारकांना खुली सूट?

कोरपना तालुक्यातील कोळशी येथील नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचे बेकायदेशीर उत्खनन करून व त्याचा साठा करून विना खनिज परवाना रेतीची परस्पर विक्री रेती घाट धारक करीत असतांना तहसीलदार मात्र याबाबत काहीही बोलायला तयार नाही, तर उलट नियमानुसार नदी घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा असायला हवी ती सुद्धा पूर्णतः गायब असून घाट धारकाला घाट दिल्यानंतर त्या घाटाच्या आराजीची सीमा मोजमाप करून आखल्या जाते त्याचा सुद्धा पत्ता नाही, हजारो ब्रास रेती तस्करी करण्याच्या उद्देशाने घाटधारकाकडून संगणकीकृत ऑनलाईन इनव्हाईस पध्दतीचा वापर केलेला नाही, संगणीकृत आॅनलाईन इनव्हाईस पध्दतीचा वापर होत नसल्याने अवैध रेती उत्खनन व विक्री होत आहे, मात्र तहसील प्रशासन यापासून अनभिज्ञ आहे याचे आश्चर्य वाटते.अर्थात तहसीलदार यांच्या आशीर्वादानेच रेती घाटावर घाट धारकांना सूट दिली आहे व नियमाला पायदळी तुडवून अवैध रेती उत्खनन होत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत तात्काळ तहसीलदार यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी होत आहे.

Previous articleसनसनीखेज ;- अखेर चंद्रपूर जिल्ह्याची बहुचर्चित दारूबंदी उठवली,
Next articleचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रमामुळे वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांना मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here