Home चंद्रपूर सनसनीखेज ;- अखेर चंद्रपूर जिल्ह्याची बहुचर्चित दारूबंदी उठवली,

सनसनीखेज ;- अखेर चंद्रपूर जिल्ह्याची बहुचर्चित दारूबंदी उठवली,

 

चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे आनंदाचा माहौल.हजारो लोकांना मिळणार हक्काचा रोजगार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

भाजप प्रणीत युती सरकारने वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली होती व दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले होते,त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचा दारूबंदी ला सख्त विरोध होता मात्र जिल्ह्यातील लिकर असोशिशन यांनी उच्च न्यायालय ते सर्वोच्य न्यायालय अशी न्यायालयीन लढाई सुरू करून सुद्धा यश आले नाही पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त दारूबंदी उठवण्याची जबाबदारी होती ती आता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पार पाडून कैबिनेट मंत्रिमंडळात दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेवून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला कोरोना काळात मोठी भेट दिली.

युती सरकारमध्ये असलेली दारूबंदी महाविकास आघाडी सरकार आल्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्यासाठी घोषणा केली आणि पाठपुरावा केला मात्र आज त्याला यश आले असून राज्याच्या कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

आता लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यात येणार असून जिल्ह्यातील बियर बार मालक यांच्यासह बेरोजगार युवकांना व छोट्या दुकानदारांना आर्थिक मंदी तून आपली सुटका करून घेण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याची घोषणा होताच जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त होत आहे.

Previous articleअतिशय दुःखद :- अम्बुलंस करिता पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह रुग्णालयातून खांद्यावर घेऊन पती बाहेर पडला..
Next articleखळबळजनक :- तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कोळशी घाटावर अवैध उत्खनन सुरू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here