मुलगा पायदळ मागे मागे. कुणाचीही मदत नाही, अत्यंत वेदनादायी घटना.
कोरोना वार्ता :-
सामाजिक माध्यमावर एक विडिओ व्हायरल झाला असून त्या विडिओ मधे एक व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ती घटना कुठली आहे माहीत नाही पण जी स्थिती विडिओ मधे दिसत आहे ती अत्यंत वेदनादायी असून ही परिस्थिती कोरोना काळात गावखेड्यावर बघावयास मिळत आहे. अनेक गावांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंतिमसंस्कार करायला कुणी गावातील माणूस जवळ येत नव्हता की नातेवाईक सुद्धा अशावेळी मदत करत नव्हते, त्यामुळे कोरोना महामारीने अनेक कुटुंब उध्वस्त तर झालेच पण सोबतच नाते सुद्धा दुरावले ही वस्तुस्थिती आहे.
डॉक्टरांचे अवाढव्य बिल व घराची परिस्थिती दयनीय असतांना कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची पुरती वाट लागली, शिवाय अम्बुलंसवाले सुद्धा दुखाच्या या स्थितीत संधी समजून ज्या प्रकारे रुग्णांकडून हजारो रुपयाचे अतिरिक्त भाडे घेत आहे त्यामुळे गरीब परिवारातील रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोठे आर्थिक शोषण या काळात झाले.
विडिओ मधे दिसत असलेल्या एका व्यक्तीला पैसे नसल्याने अम्बुलंस मिळाली नाही व Corona असल्यामुळे कुणी हात लावला नाही, ना भावकी, ना मित्र, ना नातेवाईक शेवटी नाईलाजामुळे स्वता: बायकोचे प्रेत खांद्यावर ठेवून घेवून पतीला रुग्णालयातून जाव लागलय आणि त्याचा मुलगा मागे मागे रडत जात होता, खरं तर अशी वेळ दुश्मनावर पण यायला नको पण समाजातील कुणीच व्यक्ती मदतीला आला नाही हे त्यापेक्षा भयंकर आहे.