बेटाळा बनावट भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल.
ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-
यंग एज्युकेशन इंजिनीरिंग सोसायटी कुरखेडा अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी फार्म व बी फार्म कॉलेज बेटाळा येथील संस्थेवर “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणाबाबत दाखल तक्रारीवर उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कपिलनाथ कलोडे यांनी योग्य शहनिशा न करता तक्रारकर्त्यांच्या न्यायिक प्रकरणाला सरसकट त्यांच्या स्तरावरून नस्तिबद्द केल्याने तक्रारकर्त्यांनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा चंद्रपूर यांच्यावर गुन्हेगारांना समर्थन व संघटित गुन्ह्याचा आरोप करीत थेट मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे तक्रार दाखल केली.
सदर संस्थेने पुनःमान्यते साठी वापरलेला,ग्रामपंचायत बेटाळा च्या नावाने तयार करण्यात आलेला भोगवटा प्रमाणपत्र हा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” असून ग्रामपंचायत सरपंच यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. असे लेखी आदेश गट विकास अधिकारी यांनी सदर संस्थे विरुद्ध तक्रार दाखल करण्यास ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना प्राधिकृत करीत सदर संस्थेविरुद्ध तक्रार दाखल केली.अधिकारात नसलेला शासकीय दाखला लोकनियुक्त व्यक्तीने तयार करून देणे आणी एखाद्या संस्थेने त्या बनावट दाखल्याचा शासन दरबारी वापर करून घेणे दोन्ही विषय गुन्हेगारी स्वरूपात येत असतांना योग्य कारवाही चा अभाव आणी संथगतीने चालणारी प्रक्रिया बघता तक्रारकर्त्यांनी न्यायिक मागणी साठी उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली असता त्यांनी विषयांकित बाबीची कायदेशीर कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना गट विकास अधिकारी यांना केल्यात आणी सरपंच्यावर कार्यवाही साठी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 39(1)प्रमाणे मा आयुक्त नागपूर विभाग यांच्या कडे प्रस्ताव सादर केला.
मात्र गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांनी कुठलीही कार्यवाही केल्याचे अद्याप पर्यंत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले नाही व मा. आयुक्त नागपूर विभाग यांचे कडून सरपंच्यावर कुठल्याही कार्यवाही चे आदेश प्राप्त झाले नसतांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कपिलनाथ कलोडे यांनी त्यांच्या स्तरावरून प्रकरण नस्तिबद्ध केल्याने तक्रार कर्त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना तक्रार दाखल करत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हेगारांची पाठराखण करणे आणी संघटित गुन्ह्याचा आरोप करत प्रकरणाची योग्य चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.