Home चंद्रपूर पोलीस कट्टा:- कत्तलखान्याकडे 82 जनावरांना घेऊन जाणारे ट्रक पोलीसांनी पकडले.

पोलीस कट्टा:- कत्तलखान्याकडे 82 जनावरांना घेऊन जाणारे ट्रक पोलीसांनी पकडले.

 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने झाली सर्वात मोठी कारवाई.

पोलीस कट्टा :-

तेलंगणा राज्यात कत्तलखान्याकडे जनावरे ट्रक मध्ये कोंबुन अवैद्य रित्या नेत असतांना पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 82 जनावरांची सुखरूप सुटका करून ५० लाखाचे वाहन जप्त केले आहे, जवळपास तीन वाहनाव्दारे शंभर जनावर नागभीड मूल-गोंडपिपरी मार्गे तेलंगाना राज्यात वाहुण नेणार असल्याची गुप्त माहीती नव्याने रूजु झालेले जिल्ह्याचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच अक्शन प्लॉन तयार करून जनावरे वाहुन नेणा-या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी मूल येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचेकडे सोपविली. अनुज तारे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार केले. एक पथक मूल सिंदेवाही मार्गावरील जंगलात जनावरे नेणा या ट्रकवर पाळत ठेवुन तर दुसरे पथक अनुज तारे यांचे नेतृत्वात मूल-चामोर्शी मार्गावर नाकेबंदी करून होते.

दरम्यान काल रात्री ११.३० वा. चे सुमारास तीन ट्रक मूल कडे येत असल्याची माहीती जंगलातील पथकाने नाकेबंदी वर असलेल्या अनुज तारे यांना दिली. मिळालेल्या माहीतीवरून नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करतांना ट्रक क्रमांक एमएच-४० बीएल- ८६५२ मध्ये २३ जनावर आढळुन आली. त्यावरून मोहम्मद तौसीफ अ मतीन शेख रा. अड्याळ जि. भंडारा याचेसह इतर दोघांविरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करून २ लाख ३० हजार किंमतीच्या जनावरांसह १० लाख किंमतीचे वाहन ताब्यात घेतले. समोर गेलेला ट्रक पोलीसांनी पकडल्याचे समजताच पाठीमागेहुन येणाऱ्या दोन ट्रक चालकांनी मार्गामधुनच ट्रक वळवुन नागभीड कडे परत निघाले. दरम्यान तीन पैकी दोन ट्रक नागभीड कडे निघाल्याची
माहीती जंगलात गस्त घालणाऱ्या पथकाने सिंदेवाही पोलीसांना दिली. मिळालेल्या माहीती वरून सिंदेवाही पोलीसांनी शिवाजी चौक येथे बँरीकेटस लावुन ट्रक थांबविले असता ट्रक चालकांनी ट्रक विरूध्द दिशेने भरधाव वेगात पळत सुटले. पोलीसांना चकवुन ट्रक नागभीड कडे भरधाव वेगात निघताच जंगलातील पथकाने त्यांचा पाठलाग केला, परंतु सुसाट पळालेल्या ट्रकने त्यांना समोर होवुच दिले नाही. त्यामुळे पोलीसांना चकवुन दोन ट्रक नागभीड कडे येत असल्याची माहीती नागभीड पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार नागभीड पोलीसांनी ब्रम्हपुरी टि पाईंटवर नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान राजौ २ वा. चे सुमारास क्रमांक नसलेला आयशर कंपनीचा ट्रक थांबवुन तपासले तेव्हा ट्रक मध्ये २३ जनावर दिसुन आले. तिसरा ट्रक माञ हातात न लागल्याने मार्गावर शोध घेतला असता ट्रक क्रमांक एमएच-३६- एफ-३३८९ नागभीड तुकुम मार्गावरील गोसीखुर्द कालव्याच्या मार्गावर सापडला. सदर ट्रकची तपासणी केली तेव्हा त्या ट्रक मध्ये ३६ जनावर दिसुन आले. त्यावरून नागभीड पोलीसांनी ट्रक चालक शाहीद हुसेन अफजल हुसेन, ताहीर शेख अमीन शेख या दोघांसह अन्य दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून ५ लाख ९० हजार किंमतीच्या ५९ जनावरांसह ४० लाख किंमतीचे दोन ट्रक ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे नेतृत्वात पो.उ.नि.माणीक कुमरे, पोलीस हवालदार तानु रायपूरे, वाल्मीक मेश्राम, महेश परतंगे, नरेंद्र अंडेलकर, प्रभाकर गेडाम आणि विजय जिवतोडे यांनी ५० लाख किंमतीच्या वाहनांसह ८ लाख २० हजार किंमतीचे जनावरे पकडण्याची मोठी कारवाई केल्याने जनावरे तस्करांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here