Home राजकारण “राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा”.

“राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा”.

 

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या सत्ताधारी राजकारण्यांना कानपिचक्या.

वेब न्यूज नेटवर्क:-

देशात एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट उभं असताना राजकीय पक्ष राजकारण करण्यात, निवडणुका घेण्यात मश्गुल आहेत. बाहेर गंभीर परिस्थिती असूनसुद्धा लोकांना मतदानासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं जातं,” अशी खंत मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी लोकसत्ताने घेतलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली, त्यात ते पुढे म्हणाले की आपले विचार प्रकट लोक असतील, तर आपण आहोत. त्यामुळे सध्या काही दिवस राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा,” अशा शब्दात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

राजसाहेब ठाकरे यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सरकारला व राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या की  “कोरोनातून लोकांना मानसिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यावर काय उत्तर आहे याची सरकारला आणि राजकारण्यांना कल्पना नाही. मात्र, दुसरीकडे गोव्याच्या निवडणुका लागल्या, मुंबई पालिकेच्या निवडणुका लागल्या म्हणून हे कामाला लागतात? खरं तर हे ऐकायला मिळाल्यानंतर वीट येतो,” असंही राजसाहेब ठाकरे म्हणाले.

राजसाहेब ठाकरे पुढे म्हणाले की “जगावर कोरोना संकट आलं तेव्हा कुणालाच त्याची कल्पना नव्हती. हे हाताळताना अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले. मात्र आपण अजूनही तिथंच आहोत. दुसरी लाट येणार, याची कल्पना असूनही देश सावध राहिला नाही. राजकारणी, सत्ताधारी सतर्क राहिले नाहीत. त्यामुळे 2020 पेक्षाही 2021 मध्ये ही भयानक परिस्थिती निर्माण झाली.”

इथे लोक स्थिर नाहीत, मानसिकता तशी नाही आणि निवडणुकीचे विचार होत आहेत. समाज राहिला तर निवडणुका आहेत. लोक मनाने स्थिर असतील तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे, अन्यथा त्यांचं काय करायचं. अस्थिर मन स्थिर होण्यासाठी सर्वांत जास्त प्रयत्न होणं गरजेचं आहे. हे प्रयत्न राजकारण्यांकडून होतील अशी सर्वांत मोठी अपेक्षा आहे. समाज स्थिर कसा होईल यासाठी सरकारकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. जर त्यांनी तो प्रयत्न केला नाही तर कोरोना चे संकट असेच घोंगावत राहणार अशी चेतावणी सुद्धा त्यांनी सरकारला दिली.

Previous articleपोलीस कट्टा:- कत्तलखान्याकडे 82 जनावरांना घेऊन जाणारे ट्रक पोलीसांनी पकडले.
Next articleलक्षवेधी:- रामदेव बाबांची मानसिक दिवाळखोरी झाली जाहीर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here