Home राष्ट्रीय लक्षवेधी:- रामदेव बाबांची मानसिक दिवाळखोरी झाली जाहीर?

लक्षवेधी:- रामदेव बाबांची मानसिक दिवाळखोरी झाली जाहीर?

 

बाबांच्या नावावर व्यापार करणाऱ्या रामदेव वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा.

लक्षवेधी;-

भारतात ढोंगी बाबांचे अनेक दशकांपासून जणू पीक आले आहे. स्वतःला संत म्हणवून घेणारे आसाराम. रामरहीम यांसह आजचे ढोंगी बाबा रामदेव हे सर्व व्यापारी आहेत,पण प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून भारतातील लोकांना भावनाशील करून व त्यांच्या भावनिकतेचा फायदा घेवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारी काही स्वार्थी व ढोंगी मंडळी आपल्या देशात सतत कार्यरत असतात.जनता सुध्दा अशा लोकांच्या जाळ्यात सहजपणे अडकते.नंतर जेव्हा आपण मुर्ख बनविले गेलो आहे असे लोकांच्या लक्षात येते,तेव्हा खूप वेळ झालेला असतो व या नालायक लोकांनी तोपर्यंत आपले उखळ पांढरे करुन घेतलेले असते व देशाचे बरेच नुकसान केलेले असते.

देशात सद्ध्या गाजत असलेले पतंजली प्राॕडक्टसचे मालक व्यापारी व उद्योगपती रामदेव (बाबा ?) हे सुध्दा अशीच अतार्किक,अवैज्ञानिक व असंस्कृत वक्तव्ये करून लोकांना जीवदान देणाऱ्या समस्त डाॕक्टर मंडळींचा अपमान व उपमर्द करण्यात धन्यता मानत आहे.ही अतिशय घृणास्पद बाब असून त्यांची मानसिक दिवाळखोरी जाहीर होत आहे, कारण सध्याचे प्रगत व आधुनिक वैद्यकशास्त्र असलेल्या अॕलोपॕथिच्या डाॕक्टरांचा रामदेवबाबाने जो अवमान केला आहे त्याबद्दल रामदेवबाबांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

रामदेव बाबाने अॕलोपॕथीला मूर्ख,तमाशा,बेकार आणि दिवाळखोर शास्त्र संबोधून व अॕलोपॕथीने कोरोना काळात लक्षावधी लोकांचा बळी घेतला असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन समस्त डाॕक्टरांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका व संशय व्यक्त केला आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात लोकांमधे भ्रम आणि भीती निर्माण करुन भारताच्या आरोग्य विभागाची, कोरोना योध्यांची बदनामी व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत असे आरोग्यमंत्री डाॕ.हर्षवर्धन यांनी रामदेवांना स्पष्टपणे सुनावले आहे. रामदेवांचे हे वक्तव्य कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून असंंख्य लोकांना नवीन जीवन प्रदान करणाऱ्या डाॕक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारे असून त्यांना निराश व हतबल करणारे आहे. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात धडाडीने काम करणाऱ्या लोकांना भारत सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी *कोरोना योध्दा* म्हणून घोषित केले आहे व त्यांच्यासाठी समस्त देशवासियांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे हा भारत सरकार व प्रधानमंत्र्यांचाही जाहीर अपमान असतांना बाबा रामदेव वर गुन्हा का दाखल होत नाही ही खरी चिंतेची व चिंतनाची बाब आहे, खरं तर कोरोना च्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सरकारकडून अनेकांवर गुन्हे दाखल केले मग रामदेव बाबांना सूट का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आता आयएमए या डाॕक्टरांच्या संघटनेने बाबा रामदेवांना देशद्रोही घोषित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. परंतु रामदेवबाबाची मग्रुरी इतकी वाढली आहे की, कोणाच्या बापाची मला अटक करण्याची हिंमत नाही असे म्हणत त्यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे डाॕक्टरांवर विश्वास असणाऱ्या समस्त भारतवासियांनी रामदेवबाबाच्या विरोधात आपला आवाज उठविणे गरजेचे आहे. कारण केंद्र सरकार रामदेव बाबांवर कारवाई करण्यास समर्थ नाही याचे अनेक कारणे आहेत. रामदेव बाबाने सन 2014 च्या निवडणुकीत मोदी सरकार बनविण्यात मोलाचा प्रचार प्रसार केला होता. त्या मोबदल्यात बाबांना अनेक राज्यांत आयुर्वेदिक औषधी प्रकल्प टाकण्यासाठी अत्यंत कमी किमतीत जागा दिल्या गेल्या आणि त्यांच्या पतंजली वस्तूंवर कर माफ करण्यात आले आणि आता सुद्धा भाजप हे रामदेव बाबांना वाचविण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

रामदेवबाबांचा खास शिष्य बालकृष्ण दिल्लीच्या एम्समधे घेतो अॕलोपॕथिचे उपचार.

अॕलोपॕथीच्या औषधावर आक्षेप घेणाऱ्या रामदेवबाबाचे प्रॉडक्ट तरी तरी १०० टक्के परफेक्ट आहे का ? त्यांच्या अनेक प्राॕडक्टमधे गडबड आहे हे अनेकदा सिध्द झाले आहे व संसदेत खासदार वृंदा करात यांनी रामदेवबाबांच्या ओषधांचा घोटाळा पुराव्यानिशी मांडला आहे. तरीसुध्दा रामदेवबाबा डाॕक्टरांची टिंगलटवाळी करणे म्हणजे बाबांच डोकं ठिकाणावर नाही असेच म्हणावे लागेल. अॕलोपॕथीच्या डाॕक्टरांनी आता जाहीरपणे निर्णय घ्यायला पाहिजे की, रामदेवबाबा आणि त्यांच्या अवैज्ञानिक गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांना जर आता उपचाराची गरज पडली तर त्यांच्यावर आम्ही उपचार करणार नाही.रामदेवबाबांचा खास शिष्य बालकृष्ण दिल्लीच्या एम्स मधे अॕलोपॕथिचे उपचार घेतो आणि रामदेवबाबा अॕलोपॕथीच्या डाॕक्टरांची टिंगलटवाळी करतात यामधील गौडबंगाल समजून घेणे गरजेचे आहे.रामदेवबाबा भगवे वस्त्र परिधान करतात.भगवा रंग हा त्याग, समर्पण आणि सत्यतेचे प्रतीक आहे.भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या लोकांना स्वार्थ नसतो.मोहापासून ते अलिप्त असतात.परंतु इथे तर आरपार पैसे,मोह आणि स्वार्थामधे बुडालेला माणूस भगवे वस्त्र परिधान करुन व्यापार करतो,फसव्या औषधांच्या जाहीराती करतो व लोकांपासून बक्कळ पैसा उकळून हजारो कोटींचा उद्योगपती बनतो.स्वामी विवेकानंदांनी परिधान केलेल्या पवित्र अशा भगव्या रंगाचा हा अवमान आहे.रामदेव हे बाबा नसून समाजाला फसविणारे महाठग आहे.गोड गोड बोलून लोकांना लुबाडणारे लुटारू आहे.योगाच्या नावाखाली लोकांकडून कोट्यावधी रुपये उकळणारे ढोंगी गुरू आहे. डाॕक्टरांवर संशय घेणारे व जनतेला संभ्रमीत करणारे देशाचे शत्रू आहे.म्हणूनच रामदेवबाबांना देशद्रोही घोषित करण्याची प्रधानमंत्र्यांकडे डाॕक्टरांनी केलेली मागणी एकदम रास्त व योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here