Home चंद्रपूर कौतुकास्पद :- कोरोना महामारीच्या काळात युवा सोशल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद.

कौतुकास्पद :- कोरोना महामारीच्या काळात युवा सोशल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद.

कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणारी चंद्रपूर शहरातील युवकांची सामाजिक संस्था.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

गेल्या एका वर्षापासून देशात व संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाःकार माजवलेला असतांना या संकटातून पीडित रुग्णांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले अशीच एक तरुणांनी तयार केलेली संस्था युवा सोशल फाउंडेशन चंद्रपूर ही आहे. जिल्हयातील कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकाना मदतीचा आधार देत त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी या संस्थेने फार मोलाची भूमिका निभावली जनतेच्या सेवेसाठी अक्षरशः या संस्थेतील सभासदांनी स्वतःला वाहून घेतले आहे.

या संस्थेतील युवकांनी सामाजिक कार्यातून गोरगरिबांना अनाथ अपंग आणि गरजूंना ज्या पद्धतीने मदत केली ती खरोखरंच कौतुकास्पद आहे, कारण या संस्थेतील सर्व सभासद हे सर्वसाधारण कुटुंबातील असून एक सामाजिक दायित्व म्हणून त्या संस्थेतील युवकांनी कोरोना काळात जी अनेकांना मदत केली ते सर्व सभासद कोरोना योद्धा म्हणून पुढे आले आणि त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला. ज्या देशात युवक जागरूक असेल तो देश बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही हीच अपेक्षा घेऊन उद्याचा बलशाली भारत निर्माण करण्याच्या कार्यात आपले योगदान देण्याच्या उद्देशाने युवा सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्या युवकांनी अन्नधान्य वितरण,फुड पॅकिट कपडे , मास्क , सॅनिटायझर गल्ब्स रूग्णासाठी रक्त दान प्लाझमा इत्यादी सुविधा पुरवील्या आणि गेल्या तिन महिन्यापासून चंद्रपूर जिल्हयात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात , लोकांना बेड उपलब्ध नसतांना युवा सोशल फाउंडेशन च्या पदाधिकारी व सदस्यांनी ६०-७० च्या अधिक कोविड रूग्णांना ऑक्सिजन व वेन्टीलेटर बेड उपलब्ध करून दिले . तसेच कोणाला कुठेही मदत लागल्यास युवा सोशल फाउंडेशन मदतीसाठी नेहमी तत्पर आहे .या कार्यात वंश निकोसे तौफिक पठाण ईश्वर पेंदाम , रितिक पाचभाई , हर्षल मेश्राम , सुभाष राम ,वेदांत गेडाम , चेतन नवारे , प्रियांशु येरमे , भाविक मसराम , हिमांशू नाकाडे , लावनयू मुंतमल्ला, आशिष भालेराव , मोसीम शेख ,कार्तिक ठाकरे ,मंथन नागराडे , कार्तिक तुमाणे , ऋत्विक सतारडे , गगन जेगठे ,आदित्य साहू , अभिजित वानखेडे , राम पुंडकर इत्यादींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here