हप्ता देणाऱ्या चार ते पाच रेतीचे ट्रँक्टर सोडून एकाच ट्रक्टर वर कारवाई?
भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शंकर भांदककर यांच्या भ्रष्टाचाराचे प्रताप रेती तस्करांना चांगलेच ठाऊक असल्याने ते त्यांना हप्ता देऊन मोठ्या प्रमाणात रेती चोरी करताहेत आणि त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल नायब तहसीलदार भांदककर यांचाकडून बुडविला जात आहे. जो हप्ता देईल त्याला कुठूनही रेती चोरीची खुली सूट त्यांनी दिलेली आहे पण जे हप्ता देत नसेल त्याच्या गाड्या चक्क रेती तस्कर यांच्या माध्यमातून ते पकडतात त्याहीपेक्षा कहर म्हणजे हप्ता देणाऱ्या रेती चोराच्या दोन चाकी गाडीवर बसून त्यांनी एका रेती ट्रक्टर ला पकडून तो तहसील कार्यालयात आणला आणि जे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करतात ज्यांचा शेकडो ब्रॉस रेतीचा स्टॉक आहे त्या चार ते पाच रेती ट्रक्टर चालकांना रेती भरून असतांना सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार नायब तहसीलदार भांदककर यांनी केला असल्याचा प्रकार दिनांक 7 जून ला उघडकीस आला आहे.
मुधोली परिसरात असलेल्या वायगाव रेती घाटावर मागील अनेक वर्षापासून रेतीचे अवैध उत्खनन या परिसरातील गोलू तंदिलवार, विनोद चिकाटे, तुळशीराम श्रीरामे, कार्तिक राणे, रवी अलाम इत्यादी रेती तस्कर करीत आहे पण नायब तहसीलदार भांदककर यांच्या सोबत साठगांठ असल्याने ते खुलेआम रेती चोरी करून रेतीची विक्री करतात पण दिनांक 7 जून ला वरील सर्वांचे ट्रक्टर रेती भरून असतांना एका व्यक्तीच्या ट्रक्टर ला जो नायब तहसीलदार भांदककर यांना हप्ता देत नव्हता त्याच्याच ट्रक्टर ला पकडले एवढेच नव्हे तर गोलू तंदिलवार या रेती तस्कराच्या दोन चाकी वाहनाने जावून ते रेतीचे ट्रक्टर पकडले आणि बाकी चार ते पाच रेतीचे ट्रक्टर केवळ ते हप्ता देतात म्हणून सोडून दिले.आणि जे ट्रक्टर त्यांनी तहसील कार्यालयात आणले त्याचा पंचनामा साक्षीदारांच्या समोर न करता त्या ट्रक्टर मालकांकडून पैसे घेण्याच्या नादात ते ट्रक्टर सुद्धा सोडून दिले पण त्या ट्रक्टर मालकांनी नायब तहसीलदार यांना पैसे दिले नसल्याने व आता ट्रक्टर पण हातातून गेल्यामुळे भांदककर यांनी आपले पाप लपविण्यासाठी भद्रावती पोलिस स्टेशन मधे ट्रक्टर मालकांविरोधात ट्रक्टर चोरीचा गुन्हादाखल करण्याची तक्रार दिली असल्याची माहिती असून नायब तहसीलदार भांदककर यांचा हा भ्रष्ट प्रताप महसूल विभागाला बदनाम करणारा ठरत ठरत आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात आता वरिष्ठांकडे तक्रार दाखल होणार असून त्यांच्या ऑडियो क्लिपवरून सुद्धा त्यांच्या भ्रष्टाचारांचे पुरावे शीद्ध होणार असल्याने आता तहसीलदार शितोळे यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून आहे.