Home Breaking News बस करा हि चिखलफेक, आधी कोरोना काळात आर्थिक संकटात असलेल्या गरिबांना मदत...

बस करा हि चिखलफेक, आधी कोरोना काळात आर्थिक संकटात असलेल्या गरिबांना मदत करा.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या कुरघोडी राजकारणावर प्रहार.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

राज्यात मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात गोरगरीब जनतेचे रोजगार बंद असल्याने त्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली शिवाय पेट्रोल डिझेल यासह खाद्य तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून सरकारने जनतेचा आर्थिक छळ चालविलेला आहे,तर दुसरीकडे कोरोनाच्या काळात रेशनिंग माफिया सक्रिय होऊन गोरगरिबांच्या हक्काचे रेशन हे काळाबाजार करून विकत आहेत. सरकारने लॉक डाऊन च्या काळात गोरगरीब जनतेच्या बैंक खात्यात1500 रुपये देऊ केले ते तर दिले नाहीच उलट कोरोना काळात वीज बिल माफ करायचे सोडून बिलात मोठी वाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले.

अशी सर्व दयनीय व चिंताजनक परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोड्या व चिखलफेक सुरू आहे ती त्वरित थांबवून आधी आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरिबांना कसे बाहेर काढता येईल ते बघा असा सल्ला देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष प्रतिपक्षातील नेत्यांवर प्रहार केला.

मनसे नेते बाळा नांदगावकर हे पुढे म्हणतात की एकीकडे सरकार गरिबांना कमी दरात रेशन मिळतय अस सांगतय.मग गरिबांच्या हक्काच्या या रेशनचा काळाबाजार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? हा काळा बाजार करणारे दलाल,अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत रेशनिंग आयुक्त, अन्नपुरवठा मंत्री कधी करणार?असा काळाबाजार करणाऱ्या अधिकारी आणि दलालांवर कारवाई झाली नाही तर मनसे या सर्वांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.

जनता कोरोना ने परेशान आहे. अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परंतु सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांना झोडण्यात मग्न आहेत. यात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यात मला पडायचे नाही. पण आता जनतेला गरज आहे ती मदतीची त्यामुळे आता “अनलॉक” करताना हि चिखलफेक थांबवून जनतेला मदत करावी असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

Previous articleधक्कादायक :- नायब तहसीलदार भांदककर यांचा भ्रष्ट प्रताप आला समोर ?
Next articleप्रेमाचा कट्टा:- अविवाहित जोडपे लॉज वर सापडले तर घाबरू नका,करा हे काम,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here