Home चंद्रपूर ओबीसी चळवळीला विदर्भात गती देणारे डॉ. अशोक जिवतोडे हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण.

ओबीसी चळवळीला विदर्भात गती देणारे डॉ. अशोक जिवतोडे हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण.

 

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विदर्भ चळवळीत सुद्धा अग्रणी भूमिका.

व्यक्तिविशेष :-

चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था शिक्षण महर्षी श्रीहरी जिवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि जिल्ह्यातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्याना तालुका व गाव स्तरांवर शिक्षणाची दारे मोठ्या प्रमाणात उघडल्या गेली, त्यांचाच वारसा संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी चालवला असून त्यांनी आपल्या संस्थेद्वारे शिक्षणाच्या विविध शाखाचे अभ्यासक्रम सुरू करून आधुनिक शिक्षण क्षेत्रात आपली अग्रणी भूमिका पार पाडली. त्यांचे शैक्षणिक कार्यासोबतच जिल्ह्यातील सामाजिक संस्कृतिक चळवळीतील कार्य सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. नुकत्याच कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने देशात निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थितीशी लढण्यासाठी देशवासी आपआपल्या परीने मदतकार्यात सहभाग नोंदवित असतांना डॉ.अशोक जिवतोडे यांच्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यांच्या अंगिकृत शाखांच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी दाखवून जिल्हाधिकारी कोषात आर्थीक मदत केली.

पुर्व विदर्भातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून प्रख्यात असलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे व संस्थेच्या विविध शाखांतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासली जाते,चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही एक शैक्षणीक व सामाजिक संस्था म्हणून नावारुपास आहे. या अगोदर अनेक वेळा संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यात आलेल्या आपत्तीमधे सातत्याने मदतकार्य राबवून जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात आपले सर्वोच्य योगदान संस्थेतर्फे दिल्या जाते, कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मदत निधी कोषात 1,00,000 रु. मदत निधी दिला आहे. सोबतच संस्थेच्या जनता करीअर लौन्चर द्वारा 51,000 रु., जनता शासकिय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था द्वारा 51,000 रु. व चांदा पब्लिक स्कूल द्वारा 51,000 रु. निधी देण्यात आला आहे.शिवाय राज्य शासनाच्या निर्देशानुसार संस्थेतील सर्व कर्मचा-यांचा एक दिवसाचा पगार सुद्धा या मदतनिधी कार्यात देण्यात आला आहे.

डॉ. अशोक जिवतोडे यांचे सामाजिक कार्य हे फार मोठे आहे मग ते विदर्भ आंदोलनाचे असो की ओबीसी आंदोलनाचे. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि ओबीसी प्रवर्गातील जनतेला त्यांचे भारतीय राज्य घटनेनुसार घटनादत्त आरक्षण मिळाले पाहिजे यांसाठी राष्ट्रीय स्तरांवरत्यांचा लढा सुरू आहे, असे बहुआयामी कुशल, सजग,चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण आणि लोकहीतार्थ कार्य करणाऱ्या डॉ.अशोक जिवतोडे यांच्या कार्याचा आलेख वाढतच आहे, तो उत्तरोत्तर तो वाढतच जावो हीच आशा अपेक्षा ठेवून त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो हीच भूमिपूत्राची हाक समूहातर्फे त्यांच्या वाढदिवशी प्रार्थना……
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here