Home वरोरा अबब महिलांची शेतीशाळा? होय, वरोरा तालुक्यातील बारव्हा येथे भरली महिलांची शेती शाळा.

अबब महिलांची शेतीशाळा? होय, वरोरा तालुक्यातील बारव्हा येथे भरली महिलांची शेती शाळा.

 

सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता कशी तपासावी याचे घेतले धडे.

प्रतिनिधी मनोहर खिरटकर:-

वरोरा तालुक्यातील मौजा बारव्हा येथे महिला शेतीशाळेचे आयोजन करून त्यामध्ये महिला शेतकरी निवड करण्यात आली व त्यांना उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत सोयाबीनचे पीक प्रात्यक्षिक देण्यात आले व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी तसेच बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती व सोयाबीन पिकाची पेरणी बी बी एफ व पट्टा पद्धतीने करावी इत्यादी विषयावर महिलांना कृषी सहाय्यक व्हि के आरु यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी महिलांनी शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी पारंपारिक पद्धतीने करत असलेली शेती इत्यादी विषयावर मनोगत व्यक्त केले त्यावेळी उपस्थित महिला शेतकरी व बारव्हा येथील उपसरपंच संध्या किशोर कारेकार व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous articleओबीसी चळवळीला विदर्भात गती देणारे डॉ. अशोक जिवतोडे हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण.
Next articleकाय हो नगराध्यक्ष अली साहेब,फक्त तूम्हचा गुन्हा समोर आणला म्हणून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here