Home वरोरा काय हो नगराध्यक्ष अली साहेब,फक्त तूम्हचा गुन्हा समोर आणला म्हणून शहरातील कायदा...

काय हो नगराध्यक्ष अली साहेब,फक्त तूम्हचा गुन्हा समोर आणला म्हणून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते का?

 

मग शहरात हत्त्या होते, खुनी हल्ले होतात आणि अवैध धंद्यातून गैंगवार होते तेंव्हा बिघडत नाही का?

वरोरा (अजब गजब) :-

वरोरा शहरात सद्ध्या नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यावर कुणी आरोप केले किंव्हा त्यांनी कायदा मोडला म्हणून त्यांच्याबाबत कुणी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते व धार्मिक वातावरण सुद्धा खराब होत असल्याचा जावई शोध काही कर्तबगार मंडळीनी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना समाजकंटक संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पण कर्तबगार बहाद्दर मंडळीनी उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्याकडे केली आहे.

खरं तर कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो आणि जर एखाद्या लोकप्रतिनिधी यांनी कायदा मोडला तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते ही भारतीय राज्य घटनेची खरी लोकशाही आहे, पण वरोरा शहरातील नगराध्यक्ष ज्यांना आमदार बनण्याचे डोहाळे लागले आणि म्हणून जनतेसमोर हिरो बनण्याच्या नादात त्यांनी कोरोना महामारीत लागू असलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला तरीही त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी याबाबत जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशन येथे तक्रार केली की जिथे सर्वसामान्य जनतेला एक कायदा आणि नगराध्यक्ष यांना दुसरा कायदा कसा? वरोरा शहरात जिथे दुकान उघडे ठेवले म्हणून जवळपास 60 व्यापारी दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊन त्यांची 20-20 दिवस दुकाने बंद होती तेव्हां नगराध्यक्ष अहेतेशाम अली हे का समोर आले नाही आणि त्या व्यापाऱ्यांचा, दुकानदारांचा दंड माफ केला नाही? किंव्हा त्यांच्या दुकानाचे शील तोडून त्यांची दुकाने उघडली नाही? आणि म्हणून आपला लवाजमा घेऊन ठराविक दुकानदारावर पालिका कर्मचारी व तहसील कर्मचारी यांनी कारवाई केली म्हणून नगराध्यक्ष अहेतेशाम अली हे पालिका कर्मचारी यांच्यावर संतापतात व सील केलेल्या दुकानाची सील तोडायला लावतात म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तो गुन्हा ठरत असल्याने नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जर मनसे पदाधिकारी करीत असेल तर इथे कायदा सुव्यवस्था बिघडन्याचा आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा कुठे प्रश्न उपस्थित होतो ? याचे उत्तर नगराध्यक्ष आणि त्यांच्या हुशार बननाऱ्या समर्थकांनी द्यावे,

वरोरा शहरात मागील महीना दोन महिन्यात अवैध धंद्यातून हत्त्या झाल्या, काही लोकांवर हल्ले झाले आणि शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतांना शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची नैतिक जबाबदारी असतांना त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदने देऊन चर्चा केल्याचे आठवते का? नाही, याबाबत काही पुरावे मिळत नाही पण यांनी स्वतः कायदा मोडला असताना त्याबाबत जर कुणी तक्रार केली तर तो समाजकंटक आणि त्यांच्यामुळे शहरातील शांतता सुव्यवस्था मोडते व धार्मिक वातावरण दूषित होते हा कसला शोध अहेतेशाम अली व त्यांच्या समर्थकांनी लावला? याचे आश्चर्य वाटते.

नगराध्यक्ष अली चे ते निवेदन विवादात?

शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली व धार्मिक वातावरण दूषित? झाल्याबाबत अहेतेशाम अली यांनी काही अति हुशार समर्थकांच्या साक्षीने निवेदन तयार करून त्यावर शहरातील काही तथाकथित व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक व नगरसेवक यांच्या स्वाक्षऱ्या नोंदवल्या ते निवेदनच आता वादात सापडले आहे,कारण स्वाक्षऱ्या करणाऱ्यांना हे सांगितल नाही की आम्ही याबाबत तक्रार देत आहो आणि म्हणून निवेदनात नमूद काही व्यक्तीशी संपर्क केला असता त्यांनी आपल्याला काही माहीत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या.अर्थात जर नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या विरोधात तक्रार केली किंव्हा सामाजिक माध्यमावर त्याबाबत पोस्ट केली तर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो व त्यामुळे धार्मिक वातावरण दूषित होते हा अजबगजब  जावई शोध कुणी लावला, खरं तर त्यांचा शोध घेण्याची गरज वरोरा शहरातील जनतेत निर्माण झाली आहे, कारण शहरात भरदिवसा हत्त्या होते,खुनी हल्ले होतात व अवैध धंद्यातून गैंगवार होते तेंव्हा मात्र शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत नाही असे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना वाटत असावे आणि हे जर त्यांना वाटत असेल तर ते वरोरा शहरातील जनतेची दिशाभूल करीत आहे हे शीद्ध होते आणि मनसे तर्फे जी तक्रार पोलीस प्रशासनाला देण्यात आली त्यावर चौकशी करून कारवाई व्हायला पाहिजे अशी वरोरा शहरातील सुज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here