Home चंद्रपूर धक्कादायक :- शहर पोलीस स्टेशनचे वसुली बहाद्दर सुरेश मडावी यांची पोलखोल?

धक्कादायक :- शहर पोलीस स्टेशनचे वसुली बहाद्दर सुरेश मडावी यांची पोलखोल?

 

एका चारचाकी वाहनांसह तब्बल 7 इंग्लिश दारू व बियर च्या पेट्या दिल्या सोडून, फक्त एका पेटीची कारवाई?

पोलीस पंचनामा :-

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असताना पोलीस प्रशासन गप्प का? हा प्रश्न गंभीर असला तरी या प्रश्नाचे उत्तर स्वत पोलीसच देतील अशी स्थिती तयार झाली आहे. या संदर्भात सद्ध्या पोलीस हवालदार सुरेश मडावी अग्रेसर असून ते शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या कडून वसुली करतात मात्र हद्द तर तिथे झाली जेंव्हा सहा ते सात दिवसापूर्वी एका चार चाकी वाहनात एक बियर आणि सात इंग्लिश दारू पेट्याचा माल जप्त केला होता पण वसुली बहाद्दर सुरेश मडावी यांनी चार चाकी वाहन व सात दारू व बियर च्या पेट्या पैसे घेऊन सोडून दिल्या आणि केवळ एक इंग्लिश दारूची पेटी जप्त केल्याचा दिखावा केला असल्याची माहिती असून ती गाडी नेमकी कुणाची आहे याबाबत पोलीस गोपनीयता बाळगून आहे.

खरं तर सुरेश मडावी यांचे काम काय हेच त्यांना कळले नाही त्यामुळे ते ठाणेदार यांच्या मर्जीने जणू सैराट झाले असून एका गोपनीय प्रकरणात त्यांची पोलखोल झाल्यास त्यांची उचलबांगडी होऊ शकते एवढा गंभीर मामला समोर येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here