Home ब्रम्हपुरी अरेच्या ! न.प. प्रशासनाकडून शहरातील सार्वजनिक शौचालय गहाळ?

अरेच्या ! न.प. प्रशासनाकडून शहरातील सार्वजनिक शौचालय गहाळ?

 

चार ते पाच वर्षांपासून स्थानिक शौचालयाच्या पुनःबांधणीच्या प्रतीक्षेत
————————

ब्रम्हपुरी :-
(क्रिष्णा वैद्य)

प्रभाग क्रमांक पाच मधील विद्यानगर वार्डात ग्रामपंचायत काळापासून अस्तित्वात असलेला भला मोठा सार्वजनिक शौचालय अंदाजे चारशे चौरस मिटर जागेत नागरिकांच्या सेवेत डोलात उभा असतांना नगरपरिषद प्रशासनाने पाडला व सुसज्य असा सार्वजनिक शौचालय नगरपरिषद बांधणार असा कांगावा केला मात्र चार ते पाच वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा त्या जागेवर शौचालय बांधकामाची पुनःबांधणी झाली नसल्याने स्थानिक रहिवासी अद्यापही सुलभशौचालयच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यानगर कडून तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्ग व बाजूलाच असलेला तलाठी कार्यालय आणी इंडियन गॅस एजन्सी मुळे येणारे जाणारे शहरातील व तालुक्यातील नागरिक विद्यानगर वार्डातील स्थानिक नागरिक त्या सुलभ शौचालय व मुत्रीघराचा वापर करीत असत पण सध्या त्या परिसरात कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक कुठल्या तरी भिंती च्या आळोशाला उघड्यावर नैसर्गिक विधी पार पाडत असल्याने स्थानिक लोकांना मुख्यत्वे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तत्कालीन नगरपरिषद नगरसेविका श्रीमती नलिनी सावरकर यांच्या अगदी घरा जवळील परिसरात हे सर्व घडत असतांना सार्वजनिक शौचालयातील संपूर्ण परिसर अतिक्रमनाच्या विळख्यात आल्याचे बघायला मिळत असल्याने शहरातील ईतर भागात भारत सरकारच्या महत्वकांशी अशा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नवनवीन सुलभशौचालाय बनत असताना चार ते पाच वर्षांपासून पुनःबांधणी च्या प्रतीक्षेत गहाळ झालेल्या शौचालया बाबत नागरिकानं कडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे व सार्वजनिक शौचालय च्या जागेवरील अतिक्रमण हटवून लवकरच नगरपरिषद प्रशासनाकडून सदर जागेवर सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकात जोर धरत आहे.

प्रतिक्रिया :-

शेजारील काही लोकांच्या तक्रारी मुळे तेथील शौचालय पाडण्यात आले आणी तिथे आता शौचालय होणार नाही व ईतरत्र हलविण्यात ही आलेला नाही. सद्यस्थितीत त्या जागेवरील नियोजनाची मला काहीही माहिती नाही.
श्रीमती-नलिनी सावरकर
नागरसेविका न प ब्रम्हपुरी
प्रभाग क्र पाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here