Home भद्रावती धक्कादायक :- भद्रावती येथील दारू माफिया शुभम नागपूरे च्या घरी राज्य उत्पादन...

धक्कादायक :- भद्रावती येथील दारू माफिया शुभम नागपूरे च्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड?

 

चिरिमिरी घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी माघारी फिरले असल्याची खबरबात?

भद्रावती प्रतिनिधी :-

मागील अनेक वर्षापासून भद्रावती शहरात मोठ्या प्रमाणात शुभम नागपूरे हा दारू माफिया पोलिसांना चकमा देत अवैध दारू ची खुलेआम विक्री करीत आहे. ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा माहीत आहे त्यामुळे ही तक्रार सरळ नागपूर च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाऊन त्यांच्या एका टीम ने शुभम नागपुरे च्या घरी व दुकानात काल दिनांक १२ जून ला दुपारी धाड टाकली त्यावेळी इंग्लिश व देशी दारूच्या पेट्या त्यांना मिळाल्या असल्याची माहिती सर्वत्र पसरली पण काही वेळातच पैशाची बोलणी होऊन जणू शुभम नागपूरे यांच्या घरी काहीच मिळाले नसल्याचा दिखावा करण्यात आला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी माघारी फिरले.

दारू माफिया शुभम नागपूरे यांच्या घरी सोडा फेक्टरी आहे त्यामुळे सोडा पिण्याच्या बहाण्याने लोक इथे दारू पितात त्यामुळे या परिसरातील महिला व मुलींना जाण्यायेण्याच्या मार्गावर दारुड्यांची जत्रा असल्याने त्या मार्गाने जाणे कठीण होऊन बसले आहे. या संदर्भात वार्डातिल सुज्ञ नागरिकांनी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण काही काळ शुभम ची दारू बंद करून लगेच तो सुरू करीत असल्याने कोरोना च्या काळात सर्वात गर्दी जमविणारा तो एकमेव अड्डा ठरला आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कुणी तरी नागपूर च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्या अधिकारी यांनी सुद्धा देवाणघेवाण करून शुभम नागपूरे याला मोकळे सोडले असल्याने वार्डातिल नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला आहे.

Previous articleचिंताजनक :- वरोरा तालुक्यात पाटबंधारे विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे,
Next articleखळबळजनक :- महिला पोलीस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here