Home मुंबई खळबळजनक :- महिला पोलीस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार?

खळबळजनक :- महिला पोलीस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार?

 

अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करीत पैसे उकळल्याचीही समोर आली घटना.

मुंबई न्यूज :-

फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी व युवतींनी आता सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज असून अतिशय प्रेमळ व गोड बोलून कुणी व्यक्ती जर प्रेमाच्या जाळ्यात अडकविन्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळीच सावध व्हा अन्यथा आपले फार मोठे सामाजिक व चारित्र्य हनन होऊ शकते असाच एक गंभीर प्रकार समोर आला असून फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका व्यक्तीने चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. त्याने महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करीत पैसे उकळल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याबाबत मुंबईत असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

एका व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून महिला अधिकाऱ्याची फेसबुकवर मैत्री सुरू केली व त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसबंध निर्माण झाले. काही काळाने ते प्रेम आणखी घट्ट झाले. त्यातून आरोपीने महिलेला एका ठिकाणी बोलावले. तेथे गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने याचे व्हिडीओही तयार केले होते. या व्हिडीओच्या साह्याने तो महिला अधिकाऱ्याला धमकावत होता. त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच, पैशाचीही मागणी केली.

या प्रकरणात आरोपीच्या दोन मित्रांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावले होते. त्यामुळे या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व त्रासातून महिला अधिकारी बाहेर पडली होती. नंतर आरोपीने महिलेच्या होणाऱ्या पतीलाही फोन करूनही तिची बदनामी केली. यामुळे अखेर या महिला अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी तो मेघवाडी येथे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous articleधक्कादायक :- भद्रावती येथील दारू माफिया शुभम नागपूरे च्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड?
Next articleबेधडक :- नायब तहसीलदार भांदककर यांचा हप्ता देणाऱ्या रेती माफियांना अर्थपूर्ण अभय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here