मुधोली-वायगाव परिसरात शेकडो ब्रॉस रेतीचे साठे माहीत असूनही कारवाई नाही. शासनाच्या लाखों रुपयाच्या महसूलाची चोरीत भांदककर यांचा सहभाग.
भद्रावती प्रतिनिधी :-
मुधोली वायगाव परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ सुरू असून भद्रावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शंकर भांदककर हे त्या रेती माफियाकडून हप्ता घेऊन शासनाच्या लाखों रुपयांच्या महसूलाची चोरी होतांना उघड्या डोळ्यांनी बघत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
वायगाव रेती घाटावर मागील अनेक वर्षापासून रेतीचे अवैध उत्खनन या परिसरातील गोलू तंदिलवार, विनोद चिकाटे, तुळशीराम श्रीरामे, कार्तिक राणे, रवी अलाम इत्यादी रेती तस्कर करीत असतांना त्यांच्या कडून नायब तहसीलदार भांदककर हे नियमित हप्ता घेत असल्याची चर्चा आहे. दरम्यान काही नवीन ट्रक्टर या परिसरात रेती भरायला आले तर वरील रेती माफिया हे नायब तहसीलदार भांदककर यांना निरोप देतात व ते ट्रक्टर पकडायला लावतात ही वस्तुस्थिती आहे कारण मागील 7 जून ला भांदककर यांनी चक्क गोलू तंदिलवार या रेती माफियांच्या दोन चाकी वाहनाने एका रेतीच्या ट्रक्ट्ररवर कारवाई केली व त्या ट्रक्टर मालकाला 60 हजार रुपयाची मागणी केली दरम्यान त्यांनी 30 हजार घ्या व ट्रक्टर सोडा असा हट्ट केला मात्र नंतर त्यांनी असे म्हटले की तुम्ही ट्रक्टर सोडा मी पैशाचा बंदोबस्त करतो त्यामुळे पैशाच्या लालसेने भांदककर यांनी ते पकडलेले ट्रक्टर सोडले पण ट्रक्टर मालकाने पैसे दिले नाही त्यामुळे नायब तहसीलदार भांदककर यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली.
नायब तहसीलदार भांदककर कसे भ्रष्ट आहे ते बघा.
जर नायब तहसीलदार भांदककर हे भ्रष्ट नाही तर रेतीचे ट्रक्टर पकडले ते तहसील कार्यालयात जमा न करता सोडले कसे?
कोऱ्या सुपूर्दनाम्यावर सही का घेतली तो भरला का नाही?
जप्ती पंचनामा का केला नाही? रेती चोरी करणाऱ्या व या परिसरात रेतीचे साठे असणाऱ्या गोलू तंदिलवार यांच्या दोन चाकी वाहनाने दुसरे रेतीचे ट्रक्टर का पकडले त्यासाठी स्वतःची गाडी घेवून रेतीचे ट्रक्टर का पकडले नाही? दिनांक 7 जून ची घटना असतांना चार दिवसानंतर म्हणजे दिनांक 10 जून ला पोलिसांत तक्रार देण्याचे नेमके कारण काय ? या प्रश्नाचे उत्तर नायब तहसीलदार भांदककर देण्यास असमर्थ आहे कारण त्यांचे भ्रष्टाचारात हात ओले झाले आहे, विशेष म्हणजे त्यांनी ज्यांच्या कडून पैसे घेतले त्यापैकी काही व्यक्तीकडे ऑडियो रेकॉर्डिंग असल्याने नायब तहसीलदार भांदककर यांच्या संपूर्ण केलेल्या कारवाईची व त्यांनी आजवर केलेल्या कामकाजाची चौकशी केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असे संकेत मिळत आहे.